IND vs AUS 3rd Test: नटराजन पुढील आव्हानांसाठी सज्ज, SCG मधील ‘पिंक टेस्ट’ मॅचपूर्वी केले खास Tweet
टी नटराजन (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजनला (T Natarajan) इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात केलेल्या शानदार कामगिरीच्या कामगिरीचे फळ मिळाले. नटराजनला पहिले फक्त नेट गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पाठवले होते, पण नंतर टी-20 संघात त्याचा समावेश करण्यात आला. यांनतर त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आणि त्यानंतर त्याच दौर्‍यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड झाली. त्याचबरोबर आता त्याला मधेच कसोटी मालिकेत संघात स्थान देण्यात आले असून तो कसोटी पदार्पण करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये (Sydney Cricket Ground) होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात स्वत: डेब्यू करण्याची शक्यताही दर्शवली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या काही दिवसांपूर्वी एक खास ट्विट केले आणि लिहिले की तो पुढे आव्हानांसाठी सज्ज आहे. (IND vs AUS 2020-21: टीम इंडियाला आणखी एक दुखापतीचा झटका, केएल राहुलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्ट मॅचमधून माघार)

नटराजनने टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीमधील फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "पांढरी जर्सी घालण्याचा एक अभिमानाचा क्षण, पुढील आव्हानांसाठी सज्ज." उमेश यादव दुखापतीमुळे उर्वरित कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यावर बॅकअप म्हणून नटराजनचा संघात सामील करण्यात आले. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना यादवच्या पायाला दुखापत झाली त्यानंतर तो गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर, उमेशच्या जागी वरिष्ठ निवड समितीने नटराजन आणि मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर म्हणून निवड केली. दरम्यान, तिसऱ्या टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी नटराजनला शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी कठीण आव्हान देत आहेत. शार्दूल 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला ज्यात त्याला दुखापत झाली, तर सैनी आणि नटराजनने टेस्ट डेब्यू शिल्लक आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून फलंदाज केएल राहुललाही वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने पुष्टी केली आहे. शनिवारी संघाच्या सराव सत्रात मेलबर्न क्रिकेट मैदानावर नेटमध्ये फलंदाजी करताना राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राहुल आता भारतात परतणार असून दुखापतीच्या पुढील पुनर्वसनासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) जाणार आहे.