IND vs AUS 3rd Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी टेस्टच्या (Sydney Test) चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात टीम इंडियाने (Team India) 2 बाद 98 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी अद्याप 309 धावांची गरज आहे. कांगारू संघाने पहिल्या डावात 338 धावा करत भारतीय संघाला 224 धावांवर गुंडाळले. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर संघाने 94 धावांची आघाडी घेत अखेरीस चौथ्या दिवसाखेर भारताला 407 धावांचे लक्ष्य दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसरा डावात टीम इंडियाने शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात दोन विकेट गमावल्या तर चेतेश्वर पुजारा नाबाद धावा आणि अजिंक्य रहाणे नाबाद धावा करून परतले. सिडनीच्या दुसऱ्या डावात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी पहिल्या डावाप्रमाने रोहित आणि शुभमनने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चौथ्या दिवशी वर्चस्व गाजवले. (IND vs AUS 3rd Test Day 4: सिडनी टेस्टच्या अंतिम दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 309 धावांची गरच)
चौथ्या दिवशी काही महत्वपूर्ण आकड्यांची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद केली जे खालीलप्रमाणे आहेत.
1. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत 98 चेंडूत 52 धावांचा डाव खेळला. विशेष म्हणजे रोहितचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामधील तिसरे अर्धशतक ठरले. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11वे टेस्ट अर्धशतक आहे.
2. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन यांनी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात दोन शतकी भागीदारांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाले आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी तिसर्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी करुन दोघांनी एलिट यादीत नाव नोंदवले.
3. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या डावात स्मिथला बाद करत अश्विनने विक्रमी आकड्याची नोंद केली. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला सर्वाधिक 6 वेळा बाद करणारा एकमेव भारतीय गोलंदाज बनला आहे.
4. टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीत सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी भागीदारी झाली. यासह 2010 नंतर परदेशात भारतीय सलामी जोडीमध्ये पहिल्यांदा 140 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यात रोहित आणि शुभमनमध्ये एकूण 141 धावांची (पहिल्या डावात 70, दुसऱ्या डावात 71) भागीदारी झाली.
5. सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हक आणि विंडीजच्या शिवनारायण चंद्रपॉलची बरोबरी साधली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम आणि वेस्ट इंडिज फलंदाज चंद्रपॉल यांनी 11 वेळा कसोटी कारकीर्दीत एकाच सामन्याच्या दोन डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या आणि आता स्मिथ देखील या एलिट यादीत सामील झाला आहे.
6. रोहित आणि शुभमनची जोडी कसोटीमध्ये हिट ठरताना दिसत आहे. 2006 मध्ये वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवागने यांच्या वेस्ट इंडिजविरुद्ध बॅसेटेरे येथे परदेशात चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी 50हुन अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय, दोन डावांमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 हुन धावांची भागीदारी करणारी ही जोडी उपखंडातील पहिली ठरली.
दरम्यान, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले आहेत. आणि आता अखेरच्या दिवशी टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेवर संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे भारताच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरणार नाही.