IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये (Sydney Cricket Ground) तिसऱ्या पिंक टेस्ट मॅचसाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा संघाचे विजयी नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असेल. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला (Navdeep Saini) पदार्पणाची संधी मिळाली आहे. मात्र, अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदी असताना डेब्यू करणारा सैनी पहिलाच खेळाडू नाही. यंदाच्या टीम इंडियासाठी (Team India) यंदाच्या दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सैनी चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, टी नटराजनने टी-20 आणि वनडेमध्ये, तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. दरम्यान, रहाणेला 2015 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर पहिल्यांदा भारताचे कर्णधारपद मिळाले. त्यांनतर आजवर रहाणेच्या नेतृत्वात तब्बल 11 खेळाडूंनी मुंबईकर फलंदाजाच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. झिम्बाब्वेच्या 2015 च्या दौऱ्यावर रहाणेच्या नेतृत्वात पदार्पण करणारा मनीष पांडे पहिला खेळाडू होता. पांडेने त्या दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. (IND vs AUS 3rd Test: टिम पेनने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; Will Pucovski चे ऑस्ट्रेलियासाठी डेब्यू)
त्यानंतर, त्याच दौऱ्यावर टी-20 मध्ये केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि संजू सॅमसन अशा तब्बल सहा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. नंतर रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या 2017 भारत दौऱ्यादरम्यान धर्मशाला कसोटी सामन्यात पुन्हा एकदा रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आणि यावेळी युवा फिरकीपटू कुलदीप यादवला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर, रहाणेला नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या 2020 दौऱ्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आणि आजवर झालेल्या तीन कसोटी सामन्यात शुभमन, सिराज सैनी यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2017 मध्ये, अफगाणिस्तानविरुद्ध 2018 मध्ये आणि यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटी सामन्यात संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करत विजय मिळवला आहे. त्यामुळे, कर्णधार म्हणून रहाणेचा 100 टक्के ट्रॅक रेकॉर्ड अद्याप कायम आहे.
Congratulations @navdeepsaini96. He realises his dream of playing Test cricket for #TeamIndia today. A proud holder of 🧢 299 and he receives it from @Jaspritbumrah93. #AUSvIND pic.twitter.com/zxa5LGJEen
— BCCI (@BCCI) January 6, 2021
पहा रहाणेच्या नेतृत्वात डेब्यू केलेल्या खेळाडूंची यादी
टी-20: केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि संजू सॅमसन.
वनडे: मनिष पांडे.
कसोटी: कुलदीप यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.