ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 3rd Test Day 3: सिडनी टेस्टच्या (Sydney Test) पहिल्या डावात यजमान ऑस्ट्रेलियाला (Australia) 338 धावांवर ऑलआऊट केल्यावर टीम इंडियाने (Team India) शुभमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी 244 धावांपर्यंत मजल मारली. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाबाद 28 धावा करून परतला. अशाप्रकारे कांगारू संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 94 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी शुभमन आणि पुजाराने प्रत्येकी 50 धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने 36 धावा, रोहित शर्मा 26 आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने 22 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, कांगारू संघाने भारतीय फलंदाजांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि नियमित विकेट घेत सुरुवातीपासून त्यांच्यावर दबाव कायम ठेवला. आयसीसीचा नंबर 1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्वाधिक 4 तर जोस हेझलवूडला 2 आणि मिचेल स्टार्कला 1 विकेट मिळाली. आता दुसऱ्या डावात कांगारू संघाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: चेतेश्वर पुजाराने ठोकले सर्वात मंद अर्धशतक, रिषभ पंतने दिग्गजांना मागे टाकत ऑस्ट्रेलियामध्ये केली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी)

तिसर्‍या दिवशी भारताने 2 बाद 96 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. दिवसाची सुरुवात संघासाठी चांगली ठरली नाही आणि कमिन्सने कर्णधार रहाणेला 22 धावांवर बोल्ड करत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्यानंतर, हनुमा विहारी प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि 4 धाव करून माघारी परतला. या दरम्यान, पुजाराने 174 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले जे कसोटी इतिहासातील कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात स्लो अर्धशतक ठरले. पुजारा आणि पंतमधील 53 धावांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला. मात्र, नंतर 36 धावांवर फलंदाजी करणाऱ्या पंतला हेझलवूडने डेविड वॉर्नरकडे झेलबाद करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. संघाला मोठा झटका कमिन्सने दिला. संघ ऑस्ट्रेलियाच्या शंभरहून अधिक धावांनी पिछाडीवर असताना कमिन्सने 76 चेंडूत 50 धावा करून खेळणाऱ्या पुजाराला विकेटच्या मागे झेलबाद केले. पुजारा पाठोपाठ अश्विन 10 आणि नवदीप सैनी 3 धाव करून परतले.

यापूर्वी, टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत 131 धावा केल्या. मार्नस लाबूशेन 91 आणि विल पुकोवस्कीने 62 धावांचे योगदान दिले.