SCG मध्ये मोहम्मद सिराजला अश्रू अनावर (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 3rd Test 2021: अजिंक्य रहाणेच्या भारत (India) आणि टिम पेनच्या ऑस्ट्रेलिया (Australia) संघात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) खेळला जात आहे. यापूर्वी, दोन्ही संघातील चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी आहेत. आजपासून सुरु झालेल्या सामन्यात दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कांगारू संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला माघारी धाडलं आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. दुखापतीने कमबॅक करणाऱ्या वॉर्नरला बाद करणाऱ्या सिराजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भावुक झालेला दिसत आहे. cricket.com.au ने मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात सिडनी मैदानावरील सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू झालं, तेव्हा भारताचा उदयोन्मुख तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले होते. (IND vs AUS 3rd Test: काय सांगता! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात 'या' 10 खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय डेब्यू, नावं जाणून व्हाल चकित)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सिराजचे डोळे पाणावले, जे तो राष्ट्रगीतानंतर दोन्ही हातांनी पुसताना दिसत आहे. सिराजच्या या भावनिक व्हिडीओवर चाहतेही आपली प्रतिक्रिया देत आहेत. सिराजने यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न सामन्यातून आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अ‍ॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीला दुखापत झाल्यानंतर शमीला भारतीय कसोटी संघात पहिल्यांदा संधी मिळाली. सिराजने पदार्पणाच्या सामन्यातील दोन्ही डावात एकूण 5 विकेट घेतल्या. देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते हे सर्वांना ठाऊक आहे आणि 26 वर्षीय सिराजसाठी देखील याचे खूप मोठे महत्व आहे आणि हा व्हिडिओ त्याचाच पुरावा आहे. पहा सिराजचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ:

पहा सिराजच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

खूप भावनिक आहे!

क्रिकेट ही भावना आहे!

देशप्रेम!

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते, परंतु त्याने घरी न परतण्याचा आणि आपल्या संघासह ऑस्ट्रेलियामध्ये थांबण्याचा कठीण निर्णय घेतला. आणि अखेर, त्याच्या या निर्णयाने त्याला मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.