IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Astralia) शनिवारी सिडनी टेस्टच्या (Sydney Test) तिसर्या दिवशी डाव्या अंगठ्याला फॅक्चर झाल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता पाचव्या दिवशी दुसर्या डावात फलंदाजीसाठी सज्ज आहे. तिसऱ्या कसोटीच्या चहाच्या वेळेपर्यंत भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या पण दुसऱ्या सत्रात दोन्ही फलंदाज माघारी परतल्यावर आता भारतीय संघासमोर (Indian Team) विजय मिळवण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे आणि आता त्यांच्या संपूर्ण आशा जडेजाशी आहेत. तत्पूर्वी सामन्यात जखमी झालेल्या पंतने 97 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर पुजारा 77 धावांवर बाद झाला. सध्या अश्विनबरोबर क्रीजवर असलेला विहारीही दुखापतग्रस्त आहे आणि त्याला विकेट्स दरम्यान धावताना त्रास होत आहे. दोंघांपैकी एक फलंदाज बाद झाल्यास सामना वाचवण्यासाठी जडेजा मैदानात उतरू शकतो. (IND vs AUS 3rd Test 2021: Rishabh Pant याला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथने केली चीटिंग, व्हायरल व्हिडिओनंतर यूजर्सने डागले टीकेचे बाण Watch Video)
पहिल्या डावात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कचा चेंडू हाताला लागल्याने जडेजाला त्वरित स्कॅनसाठी नेण्यात आले ज्यामुळे त्याने कांगारू संघाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. यापूर्वी, सूत्रांनी PTIला दिलेल्या माहितीनुसार “कसोटी वाचवण्यासाठी इंजेक्शन घेऊन आवश्यक असल्यास जडेजा फलंदाजी करू शकेल.” आणि आता जडेजाला मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. अंगठ्याला फ्रॅक्चर झाला असूनही जडेजा फलंदाजीला येणार हे कळताच सोशल मीडियावर यूजर्सकडून स्टार भारतीय अष्टपैलूच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले जात आहे. पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
जाडेजा सज्ज
Ravindra Jadeja getting ready for historic sword celebration. 🙌#AUSvIND pic.twitter.com/KTlJuMHYHt
— Manish (@iHitman55) January 11, 2021
ग्रिट आणि गमप्शन
More than a quarter of the Indian team has at some point popped a painkiller or two over the last 3 days. From Pujara to Pant to Jadeja to now Vihari. This has already been some show of grit and gumption #AUSvIND
— Bharat Sundaresan (@beastieboy07) January 11, 2021
जडेजा मैदानात उतरण्यासाठी तयार
Sir Jadeja pading up inspite of having fractured thumb 👑 pic.twitter.com/5UJcTw2IUg
— Shivani (@meme_ki_diwani) January 11, 2021
जड्डू शो
Pant show. Jaddu 😎 show coming#RishabhPant#Jadeja #AUSvIND #AUSvsIND pic.twitter.com/rAgrXyNKhn
— Dinu Rajput 💛 (@7MSDIANDINU) January 11, 2021
फायटर जड्डू
Sir_jadeja is Ready for Batting 🙌🙌
Fighter Jaddu ❤️❤️😘 pic.twitter.com/k5kGhMSHJx
— vats7631 (@almighty7631) January 11, 2021
योद्धा
This team of soft spoken gentlemen transforms on the field into warriors who never cross the line but never take a backward step. Matching opposition punch for punch, putting body on the line. Whatever happens from here this team has won the respect of the cricket world. #AUSvIND pic.twitter.com/FPF8lchjLB
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 11, 2021
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतींचा फटका बसला आहे. इशांत शर्मा दुखापतीमुळे दौऱ्यावर खेळू शकला नाही तर मोहम्मद शमी आणि उमेश यादव देखील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मायदेशी परतले आहेत. त्यानंतर, तिसऱ्या कसोटीत पंत आणि जडेजालाही दुखापत झाली. पंतची दुखापत गंभीर नाही आहे, मात्र जडेजा अंतिम ब्रिस्बेन कसोटीला मुकणार आहे. दरम्यान, जडेजाच्या जागी बदली खेळाडूची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.