Tim Paine Fumes at Umpire: ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कॅप्टन टिम पेन (Tim Paine) याने भारताविरुद्ध सिडनी टेस्टच्या (Sydney Test) तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आपल्यावरील ताबा गमावला आणि मैदानावरील अंपायरशी वाद घालत अपशब्दांचा वापर केला. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार सोशल मीडियावर टीकेचा पात्र ठरला आहे. भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या टेस्ट सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आणि पॅट कमिन्सने भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेला बोल्ड आऊट करत संघाला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. कांगारू गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे रहाणे बर्याच दबावात दिसत होता, तर चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) देखील धावांची संघर्ष करावे लागत आहे. या दरम्यान, नॅथन लायनच्या चेंडूवर पुजारा आऊट होता-होता वाचला. ऑस्ट्रेलियानेही पुजाराविरोधात DRS देखील घेतला आणि भारतीय फलंदाजाला नॉटआऊट दिल्यावर पेनने आपल्या वरील ताबा गमावला आणि पंचांशी जाऊन वाद घातला. (IND vs AUS 3rd Test Day 3: चेतेश्वर पुजारा-रिषभ पंतचा टीम इंडियाला सहारा, तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारत ऑस्ट्रेलियाच्या 158 धावांची पिछाडी)
भारताच्या डावातील 56व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली जेव्हा लायनचा चेंडू पुजाराच्या बॅट आणि पॅडला लागून हवेत उडाला व शॉर्ट लेगवर खेळाडूने झेल घेतला. त्यानंतर सर्व खेळाडूंनी जोरदार अपील केले, परंतु मैदानातील अंपायर पॉल विल्सनने पुजाराला नॉटआऊट दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएसचा वापर केला आणि अल्ट्रा एजमध्ये थोडासा स्पाइक दिसला, परंतु चेंडू बॅटला लागला की नाही याची खात्री न पटल्याने थर्ड अंपायरने पुजाराला नॉटआऊट दिले. यानंतर लगेच पेनने आपल्यावरील ताबा गमावला आणि निर्णयावर पंचांशी जाऊन भिडला. पेनने या दरम्यान अपशब्द वापरतानाही दिसला. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने सांगितले की, मेलबर्न कसोटीत त्याला स्पाईकच्या जोरावर त्याला बाद केले गेले होते, तर पुजाराला का नाही. पेनचे बोलणे स्टम्प माइकमध्ये कैद झाले आणि नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हे हसण्यावारी नेले तर काहींनी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने वापरलेल्या भाषेबद्दल टीका केली.
Australia lose a review trying to prize out Pujara. Another fantastic decision by the umpire #AUSvIND pic.twitter.com/k1coiuhI1W
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
पहा काय म्हणाला पेन
Did anyone else hear this after Australia's unsuccessful DRS on Pujara?
Umpire Paul Wilson responding to Tim Paine's protest: "He's making the decision, not me, I'm not third umpire."
Tim Paine: "Fucking consistency, Blocker, there's a thing (spike) that goes past it." #AUSvIND
— Andrew Wu (@wutube) January 8, 2021
दरम्यान, मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात पेन देखील अशाच प्रकारे बाद झाला जेव्हा त्याच्या बॅटच्या कडेला लागून चेंडू विकेटच्या मागे रिषभ पंतकडे गेला. तथापि, त्यावेळी हॉटस्पॉटमध्ये काहीही दिसले नाही, परंतु अल्ट्रा एजमध्ये एक स्पाइक दिसल्याने पेनला बाद केले गेले. तत्पूर्वी, सिडनी कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला होता. स्टीव्ह स्मिथने संघाच्या वतीने फलंदाजी करताना 131 धावा केल्या होत्या.