IND vs AUS 3rd T20I: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सिडनी (Sydney) येथे खेळल्या जाणार्या मालिकेच्या तिसर्या आणि अंतिम टी-20 सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) शानदार क्षेत्ररक्षण करत सर्वांची मनं जिंकली. भारतीय खेळाडूंनी बर्याच संधी गमावल्या आणि यादरम्यान सॅमसनची फिल्डिंग टीम इंडियासाठी (Team India) दिलासादायक ठरली. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमावून 186 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावा तर ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 14व्या ओव्हरदर्म्य अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका मारला. मॅक्सवेलने चेंडूला इतका चांगला मारला की तो त्याच्या जागेवरून सरकला नाही. त्याने बॉल सीमारेषा ओलांडण्याची अपेक्षाही केली, पण 26 वर्षीय सॅमसनने सुपरमॅनसारखी हवेत उडी मारली आणि चेंडू पकडला. तो सीमेपलीकडे जात होता आणि अशा परिस्थितीत त्याने सतर्कता दाखवली व चेंडू पुन्हा मैदानात फेकला. (IND vs AUS 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मॅथ्यू वेड-ग्लेन मॅक्सवेल यांचा दे दणादण, भारतापुढे 187 धावांचं तगडं आव्हान)
अशाप्रकारे सॅमसनने चार धावा वाचवल्या आणि ऑस्ट्रेलियाला फक्त दोन धावच मिळाल्या. संजूने आपल्या समज दाखवत षटकार रोखला आणि आश्चर्यकारक फिल्डिंगचे प्रदर्शन केले. सॅमसनला फलंदाजीने मात्र 10 धावाच करता आल्या. सॅमसनचे प्रयत्न पाहून प्रत्येकाला निकोलस पूरण आठवले जेव्हा पूरनने आयपीएल 2020 मध्ये असाच प्रयत्न करून चौकार वाचविला होता. आयसीसीने संजूचे चित्रही पोस्ट केले होते आणि लिहिले आहे, "सुपर संजू, मॅक्सवेलचा हा शॉट षटकार होता पण संजू सॅमसनने त्याला अडवले." पाहा व्हिडिओ:
Sanju Samson is a gun fielder. Another save in the boundary line.#AUSAvIND pic.twitter.com/bgzrNWnJ5E
— Dr. R.S. Meena Pahruaa (@drpahruaa) December 8, 2020
ICC चे ट्विट
Super Sanju 🔥
The hit from Maxwell was destined to go for six, before Sanju Samson made a sensational stop at the boundary!#AUSvIND pic.twitter.com/qneXSpHwYj
— ICC (@ICC) December 8, 2020
दरम्यान, भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी व संघाच्या गचाळ फिल्डिंगमुळे ऑस्ट्रेलियाने 186 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज अर्धशतक झळकावले. भारताने पूर्वी कॅनबेरा आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेले पहिले दोन्ही सामानाने जिंकून टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून त्यांच्यापुढे यजमान संघाविरुद्ध टी-20 मालिकेत दुसऱ्यांदा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.