टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी- 20 (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd T20I Live Streaming: टीम इंडियाने (Team India) सिडनी (Sydney) येथे खेळलेला दुसरा आणि निर्णायक सामना जिंकला आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा हा सलग 10वा टी-20 विजय होता. यासह भारतीय संघाने (Indian Team) पाकिस्तानचा विक्रम मोडला ज्यांनी 2018 मध्ये सलग नऊ टी-10 सामने जिंकले होते. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने (Australia) वनडे  मालिकेत 2-1 ने जिंकली होती. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:40 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 1:10 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (IND Vs AUS 2nd T20I 2020: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली याने लगावलेला षटकार पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; पाहा व्हिडिओ)

पहिले जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतलेल्या विराटसेने यजमान कांगारूंचा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. टीम इंडियाने आजचा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरी दुसऱ्यांदा व्हाईट-वॉश करेल. यापूर्वी टीम इंडियाने यजमान कांगारूंचा 2016मध्ये 3-0ने क्लीन स्वीप केला होता. शिवाय, टीम इंडियाला सलग 5वी टी-20 मालिका जिंकण्याची तर विरोधी संघाविरुद्ध सलग तिसऱ्यांदा मालिकेसाठी स्वीप करण्याची देखील संधी आहे. यापूर्वी जानेवारीत भारतीय संघाने श्रीलंकेला 2-0 आणि न्यूझीलंडला 5-0 ने पराभूत केले आहेत.

पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारताचा टी-20 संघ

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट आणि अ‍ॅडम झँपा.

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन.