IND vs AUS 3rd ODI: विराट कोहलीचा टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले मोठे बदल; टी नटराजनचे डेब्यू
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे  (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) आज तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा अंतिम सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल (Manuka Oval) मैदानावर खेळला जाईल. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारताकडून टी नटराजनने (T Natarajan) डेब्यू केले आहे. मयंक अग्रवालला देखील बाहेर केले असून शुभमन गिलला संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच पहिले दोन सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे लक्ष क्लीन स्वीपवर असेल तर टीम इंडियापुढे क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान असेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिलत आहे. डेविड वॉर्नरच्या (David Warner) अनुपस्थितीत मार्नस लाबूशेन कर्णधार आरोन फिंचसोबत सलामीला येईल. मिशेल स्टार्कलाही दुखापत झाल्याने बाहेर बसावे लागत आहे. पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे. (IND vs AUS 3rd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती)

ऑस्ट्रेलियाकडुन कॅमेरून ग्रीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ग्रीनचा जागी समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाने देखील त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मागील दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे, त्यामुळे काहींना विश्रांती देण्यात आली आहे. नवदीप सैनीच्या जागी टीम इंडियाने शार्दूल ठाकूर, तर युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवचा समावेश केला आहे. टी नटराजनचा मोहम्मद शमीच्या जागी समावेश करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघ मालिकेत सलग सहावा पराभव टाळण्यासाठी मैदानावर उतरतील.

पाहा ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), मार्नस लाबशेन, स्टीव्ह स्मिथ, मोइसेस हेनरिक्स, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅश्टन अगर, सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅडम झँपा आणि जोश हेजलवुड.

भारत: शिखर धवन, शुभमन गिल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, टी नटराजन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर.