मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test Day 4: भारताविरुद्ध (India) दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया (Australia) संघ ऑलआऊट झाले. चौथ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत दुसऱ्या डावात कांगारू संघ 200 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि टीम इंडियापुढे (Team India) 70 धावांचे लक्ष्य ठेवले. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यावर कॅमरुन ग्रीनने (Cameron Green) एकाकी झुंज देत 45 धावा केल्या आणि संघाच्या आघाडी वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 40 तर मार्नस लाबूशेनने 28 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात भारतीय संघाने 326 धावांपर्यंत मजल मारत 131 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात यजमान संघासाठी फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली. एकही फलंदाज मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईन-अपचा भारतीय गोलंदाजांनी धुव्वा उडवला. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 3  जसप्रीत बुमराह, रवींचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर उमेश यादवला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS Boxing Day Test 2020: मॅथ्यू वेडचा रिषभ पंतला डिवचण्याचा प्रयत्न, कारण जाणून तुम्हालाही होईल राग अनावर, पहा व्हिडिओ)

दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलिया संघाने तिसर्‍या दिवशी 99 धावांवर 6 गडी गमावले होते. एकेकाळी संघावर डावाने पराभवाची टांगती तलवार असताना ग्रीन आणि कमिन्सने संघाला अडचणीतून काढले. ग्रीनबरोबर कमिन्सच्या 57 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. 103 चेंडू खेळल्यानंतर कमिन्सने 22 धावांवर मयंक अग्रवालकडे झेलबाद होऊन माघारी परतला. 45 धावांवर फलंदाजी करत असलेल्या ग्रीनला सिराजने माघारी पाठवत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात 195 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांनतर अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजाच्या शतकी भागीदारीने त्यांच्या चिंतेत भर घाटी. कर्णधार रहाणेचे शतक आणि जडेजाचा अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली.

पहिल्या डावात जडेजाने 57 धावा केल्या तर पहिला सामना खेळत शुभमन गिलने 45 धावांचे योगदान दिले. अशास्थितीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारू संघाने 2 धावांची नाममात्र आघाडी घेतली. मात्र, चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत ग्रीन आणि कमिन्सने भागीदारी करत संघाची आघाडी वाढवली. यजमान संघाने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात डावात 6 बाद 133 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली.