IND vs AUS Boxing Day Test 2020: मॅथ्यू वेडचा रिषभ पंतला डिवचण्याचा प्रयत्न, कारण जाणून तुम्हालाही होईल राग अनावर, पहा व्हिडिओ

मेलबर्न टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव आणला आहे, तर रिषभ पंत देखी विकेटच्या मागून दबाव निर्माण करण्यास कोणतीही कसर सोडत नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पंतचा दबाव इतका वाढला की कांगारू सलामी फलंदाज मॅथ्यू वेडने पंतच्या जवळ जाऊन स्लेज करण्याचा प्रयत्न केला.

IND vs AUS Boxing Day Test 2020: मॅथ्यू वेडचा रिषभ पंतला डिवचण्याचा प्रयत्न, कारण जाणून तुम्हालाही होईल राग अनावर, पहा व्हिडिओ
Rishabh Pant (Photo Credits: Twitter/ICC)

IND vs AUS Boxing Day Test 2020: मेलबर्न (Melbourne) टेस्टमध्ये टीम इंडियाने (Team India) यजमान ऑस्ट्रेलियाला (Australia) बॅकफूटवर टाकले आहे. पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेत टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव आणला आहे, तर रिषभ पंत (Rishabh Pant) देखी विकेटच्या मागून दबाव निर्माण करण्यास कोणतीही कसर सोडत नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पंतचा दबाव इतका वाढला की कांगारू सलामी फलंदाज मॅथ्यू वेडने (Matthew Wade) पंतच्या जवळ जाऊन स्लेज करण्याचा प्रयत्न केला. वेडने झुंजार 40 धावांची खेळी केली. या दरम्यान, पंत आणि वेडमध्ये अनेकदा स्लेजिंग बघायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह 25वी ओव्हर टाकण्यासाठी आला आला तेव्हा वेड स्ट्राइकवर असल्याने त्याने पंत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूं आणि पंत यांच्यात एक वेगळंच नातं आहे. स्लेजिंग करण्यास पटाईत असलेल्या कांगारू संघाची पंत आपल्याच अंदाजत बोलती बंद करतो. (IND vs AUS 2nd Test 2020: टिम पेन नॉट आऊट पण रहाणे आऊट? अजिंक्यच्या विकेटवरून Netizens चा थर्ड अंपायर सायमन टॉफेलवर पक्षपातचा आरोप)

बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी बुमराहच्या ओव्हरचा पहिला चेंडू खेळल्यावर पंत वेडकडे पाहून हसायला लागला. याचवेळी वेडने देखील पंतकडे बघितले आणि हसत म्हणाला की, ‘तू स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघितलस का, तुझं वजन 20 ते 25 किलो जास्त आहे.’ पंत विकेटच्या मागून सतत काहीतरी बोलत होता, ज्यामुळे मॅथ्यू वेड अस्वस्थ झाला. सुरवातीला वडेने पंतकडे दुर्लक्ष केले पण चहाच्या वेळेपूर्वी तो स्वत:ला रोखू शकला नाही. हे वाक्य स्टम्प माइकमध्ये कैद झाले जे ऐकून भाष्यकार देखील काही काळ आपले हसू रोखू शकले नाही. पहा व्हिडिओ:

दरम्यान, टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली. याच्या प्रत्युत्तरात हा लेख लिहीपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 155 धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली असून चौथ्या दिवशी ते ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात असतील.

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2020 06:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).