India National Cricket team vs Australia National Cricket Team Live Telecast: ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सध्या ऋषभ पंत 28 धावा आणि कर्णधार नितीश कुमार रेड्डी 15 धावांसह खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पॅट कमिन्स आणि स्कोर बोलँडने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत, तर मिचेल स्टार्कनेही एक विकेट घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. मार्नस लॅबुशेनने 64 धावांचे अर्धशतक झळकावले, पण ट्रेव्हिस हेड सामन्याचा हिरो ठरला. 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने 140 धावा केल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते. (हेही वाचा - AUS vs IND 2nd Test 2024: टीम इंडिया पराभवाच्या छायेखाली, कांगारूंचा कहर, दुसऱ्या डावातही फलंदाजांचा फ्लॉप शो)
दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांवर सामना वाचवण्याची मदार असेल. भारताकडून सध्या पंत आणि नितीश कुमार हे क्रिजवर असून या दोघांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
कुठे पाहणार सामना
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. याशिवाय त्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही उपलब्ध असेल.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज