स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd T20I: भारत (India) आणि यजमान यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सिडनीवर (Sydney) खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो'चा आहे, तर भारतीय टीमपुढे मालिका जिंकण्याची संधी असेल. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार आरोन फिंचला (Aaron Finch_ दुखापत झाल्याने त्याला आजच्या सामन्याला मुकावे लागत आहे, अशा स्थितीत फिंचच्या जागी मॅथ्यू वेड (Matthew Wade) संघाचे नेतृत्वात करत आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार वेडभारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात आजच्या मॅचसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकताच तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतील. (IND vs AUS 2nd T20I Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल?)

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल झाले आहेत. मोहम्मद शमी, मनीष पांडे यांच्या जागी शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यरला संधी मिळाली, तर रवींद्र जडेजाच्या ऐवजी युजवेंद्र चहलचे संघात कमबॅक झाले आहेत. जडेजाच्या जागी सातव्या स्थानावर आता वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलूची भूमिका बजावताना दिसेल. मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसन आणि मनीष पांडे यांचे स्थान कायम ठेवण्यात आले आहेत तर जसप्रीत बुमराहच्या जागी दीपक चाहरचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून आजच्या सामन्यात डॅनियल सॅम्सला टी-20 मध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. कर्णधार फिंच आजचा सामना खेळणार नसून त्याच्या जागी मार्कस स्टोइनिसआणि जोश हेजलवुडच्या जागी अ‍ॅन्ड्र्यू टायचा समावेश झाला आहे.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन

भारत: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन.

ऑस्ट्रेलिया: मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड (कॅप्टन/विकेटकीपर), मोइसेस हेनरिक्स, डार्सी शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, डॅनियल सॅम्स, सीन एबॉट, मिच स्वीपसन, अँड्र्यू टाय आणि अ‍ॅडम झांपा.