IND vs AUS 2nd ODI Weather Report: दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कसे असेल इंदूरचे हवामान?
SuryaKumar Yadav (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियासोबत सुरू झालेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय (India Beat Australia) मिळवत आघाडी घेतली आहे. आता भारताच्या नजरा 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या वनडेत विजयाची नोंद करून मालिका आपल्या खात्यात नेण्यावर आहेत. इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात पावसामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. हवामान अहवालानुसार येथे पावसाची शक्यता आहे. मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी अतिशय संयमी कामगिरी दाखवली. (हे देखील वाचा: Team India ICC Rankings Number One: टीम इंडियाने रचला नवा इतिहास, एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनण्याचा केला विश्वविक्रम)

सामन्यादरम्यान पावसाची शक्यता

सलामीच्या फलंदाजांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली. ज्यात शुभमलन गिल आणि रुतुराज गायकवाड यांनी अर्धशतकी खेळी खेळली. आता दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार, 24 सप्टेंबर म्हणजेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मोहालीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊसही पाहायला मिळाला. मात्र, या सामन्यावर फार काळ परिणाम झाला नाही आणि पाऊस थांबताच सामना पुन्हा सुरू झाला.

24 सप्टेंबरला इंदूरचे हवामान कसे असेल?

रविवारी इंदूरच्या हवामान अहवालानुसार, दिवस ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे. दिवसाच्या सुरुवातीला काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याचवेळी सायंकाळी शहरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदाजानुसार, येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. सामन्यादरम्यान काही तास हलक्या पावसाचा धोका आहे, ज्यामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सकाळी नऊ आणि संध्याकाळी सहा वाजता येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिवसभर ढगाळ वातावरण राहील.