IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘रेट्रो’ लुकमध्ये दिसणार भारतीय संघ, शिखर धवनने दाखवली झलक, पाहा फोटो
टीम इंडियाच्या ‘रेट्रो’ जर्सीत टीम इंडिया (Photo Credit: Instagram)

Team India Jersey for Australia Tour 2020-21: भारतीय सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आगामी मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी नवीन किट प्रायोजक म्हणून MPL स्पोर्ट्ससह टीम इंडियाच्या (Team India) नवीन रेट्रो जर्सी परिधान करून सोशल मीडिया अकाउंटवर सेल्फी पोस्ट केली. भारतीय संघाच्या (Indian Cricket Team) वनडे आणि टी-20 संघाचा भाग असलेल्या धवनने नवीन जर्सीची झलक दाखवत कॅप्शनमध्ये लिहिले की, "न्यू जर्सी, नूतनीकरण प्रेरणा. खेळण्यासाठी सज्ज." 90च्या दशकातून प्रेरित असलेली ‘रेट्रो’ थीम जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) आहे. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्सचे नावही आहे. मागील महिन्यातच बीसीसीआयने (BCCI) एमपीएलला (MPL) नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते. एमपीएलबरोबर बीसीसीआयने 120 कोटी रुपयांचा अधिक महसूल वाटा असा तीन वर्षांचा करार केला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour of India) रवाना झाल्यापासून संघ मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी नवीन जर्सीत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (IND vs AUS 2020-21: टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित आणि इशांत शर्मा पहिल्या दोन टेस्ट मॅचमधून आऊट, BCCI कडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा)

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील यापूर्वी 11 नोव्हेंबर रोजी खास डिजाईन असलेल्या जर्सीचे अनावरण केले होती जी ASICS आणि दोन स्वदेशी महिलांच्या सहयोगाने बनवण्यात आली आहे. फियोना क्लार्क आणि कर्टन हाजेन हे त्या स्वदेशी महिलांची नावं आहेत. फियोना क्लार्क या दिग्गज क्रिकेटपटू मास्किटो यांच्या वंशज आहेत तर मास्किटो 1868 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणारे ऑस्ट्रेलिया संघाचे पहिले स्वदेशी क्रिकेटपटू होते. पाहा टीम इंडियाची ‘रेट्रो’ थीम जर्सी: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

दरम्यान, टीम इंडिया सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी सिडनी येथे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत. तथापि, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षणासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताने मजबूत संघ जाहीर केला असला तरी रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे संघाला त्रास होऊ शकतो. शिवाय, शिखर धवनसह सलामीला कोण येणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.