IND vs AUS 2020-21 Series: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) आता आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) मैदानावर दौऱ्यावरील अंतिम सामना खेळला जात आहे. अनेक महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियासाठी (Team India) 4 खेळाडूंनी डाऊन अंडर क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मालिकेतून टीम इंडियासाठी काही चांगली गोष्ट घडली तर ती म्हणजे भविष्यातील कसोटीपटूंचे आगमन. दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाला काही खरे नायक सापडले आणि विशेष म्हणजे ते संघातील युवा खेळाडू आहेत ज्यांनी विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत जबाबदारी उचलली आणि प्रभावी कामगिरी बजावली जी त्यांच्या कारकिर्दीतील गरुडझेप सिद्ध होऊ शकते. (IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्टमध्ये विकेटच्या मागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन’ गाणं गाताना रिषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हालाही फुटेल हसू)
आज आपण या लेखात अशाच 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी संघासाठी अविश्वसनीय कामगिरी बजावली.
1. टी नटराजन
जर कोणी भारतीय निवडकर्त्यांना आणि चाहत्यांना प्रभावित केले असेल तर तो नटराजन आहेत. मूळ टी-20 संघाचा भाग असलेल्या नटराजनला दुखापतीमुळे एकदिवसीय सामन्यात स्थान मिळाले. त्याने तीन गडी बाद केले. त्यानंतर, त्याने टी-20 मध्ये पदार्पण केले आणि सामनावीर हार्दिक पांड्याला पुरस्कार देऊनही नटराजनच्या कामगिरीचे सर्वांनीच तोंडभरुन कौतुक केलं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत तीन विकेट घेत आपला फॉर्म त्याने रेड-बॉल क्रिकेटमधेही कायम ठेवला.
2. मोहम्मद सिराज
दौऱ्याची सिराजची चिंताग्रस्त सुरुवात होती पण प्रत्येक चेंडूसह तो परिपक्व बनला. त्यानंतर, त्याने ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्व केले. आणि चौथ्या दिवशी त्याची कामगिरी, जिथं त्याने पाच विकेट घेतले ते त्याच्या ऑस्ट्रेलियन दौर्याचे आकर्षण ठरले.
3. शार्दुल ठाकूर
जखमी जसप्रीत बुमराहची बदली म्हणून संघात दाखल झालेल्या ठाकूरने अष्टपैलू भूमिका बजावली. वॉशिंग्टन सुंदर याच्याबरोबर त्याच्या विक्रमी शतकी भागीदारीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचे आव्हान कायम ठेवले. त्याने चेंडूने देखील प्रभावी कामगिरी बजावली. 29 वर्षीय 'पालघर-एक्सप्रेस'ने चौथ्या सामन्यात 7 विकेट घेतल्या.
4. वॉशिंग्टन सुंदर
कसोटी सामन्यात पहिले अर्धशतक ठोकण्यापासून चार विकेट घेण्यापर्यंत सुंदरने कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त डेब्यू केले. सुंदर आणि ठाकूर यांनीही 123 धावांची भागीदारी करुन भारतासाठी ब्रिस्बेनमध्ये सातव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीची रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी केली.
5. शुभमन गिल
पृथ्वी शॉच्या सतत अपयशानंतर मेलबर्नच्या बॉक्सिंग डे सामन्यातून शुभमनने कसोटीमध्ये पदार्पण केले आणि सलामी फलंदाज म्हणून या 21 वर्षीय खेळाडूने नक्कीच ठसा उमटवला. शुभमनने सिडनीच्या दुसऱ्या डावात 50 धावा करत पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. शिवाय, रोहित शर्मासोबत त्याच्या भागीदारीने संघाला दोन्ही सामन्यात प्रभावी सुरुवात मिळाली.