सचिन तेंडुलकर आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Facebook)

India Tour of Australia 2020-21: स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. अशा स्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) आगामी डाऊन अंडरमध्ये मागील ऐतिहासिक मालिकेतील विजयाची पुनरावृत्ती करण्याचे कठीण आव्हान असेल. भारताच्या 2018-19 मधील मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour of Australia) मुकलेला स्मिथ यंदा पूर्ण जोशाने खेळणार असल्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) बॅगी ग्रीन फलंदाजाला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना खास सल्ला दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी मालिकेदरम्यान त्याने या वेगवान फलंदाजाच्या 'पाचवा स्टंप'वर मारा करण्याचा सल्ला दिला. बॉल टॅम्परिंग प्रकरणात सामील झाल्यामुळे भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान 2018-19 मालिकेला मुकलेला स्मिथ यंदा भरपाई करण्यासाठी सज्ज असेल जे की भारतीय खेळाडूंसाठी घातक सिद्ध होऊ शकते. स्मिथने भारताविरूद्ध सहा कसोटी शतकं केली आहेत. क्रिकेटचा महान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या मास्टर-ब्लास्टरने भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद करण्यासाठी त्याच्या 'पाचवा स्टंप'वर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘रेट्रो’ लुकमध्ये दिसणार भारतीय संघ, शिखर धवनने दाखवली झलक, पाहा फोटो)

"स्मिथचे तंत्र अपारंपरिक आहे... सामान्यत: आपण कसोटी सामन्यात गोलंदाजाला ऑफ-स्टंपवर किंवा चौथ्या स्टंपच्या आसपास गोलंदाजी करण्यास सांगू शकतो, पण स्मिथ मूव्ह करतो. त्यामुळे, कदाचित चेंडूत लाईनच्या चार ते पाच इंच आणखीन पुढे असायला हवा. स्मिथच्या बॅटची कडा घेण्यासाठी चौथ्या किंवा पाचव्या स्टंप लाईनमध्ये गोलंदाजी करण्यावर लक्ष्य केंद्रित करायला हवे. जास्त काही नाही फक्त लाईन आणि मानसिकता बदलायाला हवी," तेंडुलकरचे म्हणणे PTIने उद्धृत केले. "स्मिथ शॉर्ट-पिच बॉल मारण्यासाठी सज्ज असतो, हे मी वाचले आहे, सुरुवातीपासूनच गोलंदाज त्याच्याविरुद्ध आक्रमक वृत्ती बाळगतील अशी त्याला आशा आहे. पण मला वाटते की ऑफ स्टम्पच्या बाहेर त्याची टेस्ट घेतली पाहिजे त्याला बॅकफूटवर ठेवा आणि सुरवातीलाच चूक करून घ्या," मास्टर-ब्लास्टरने पुढे म्हटले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हाय-प्रोफाइल मालिका 27 नोव्हेंबर रोजी सुरू होईल. कर्णधार कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने, तितकेच टी-20 सामने आणि चार कसोटी सामने खेळणार आहे.