
IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर 17 डिसेंबरपासून टीम इंडिया (Team India) कसोटी मालिका खेळणार आहे. उशिरा फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ‘हिटमन’ मात्र पहिल्या दोन कसोटी सामान्यांना मुकणार असल्याने तिसर्या कसोटी सामन्यातच संघात निवडसाठी उपलब्ध होईल. यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील (Indian Cricket Team) तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये (Sydney) खेळला जाईल. रोहित आता 14 दिवस क्वारंटाइन राहणार असून संघात सामील होण्यापुर्वी त्याची कोविड-19 टेस्ट केली जाईल. अॅडिलेडमध्ये (Adelaide) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये उशीरा आगमन झाल्यामुळे आणि कोरोना व्हायरस उपायांमुळे रोहित केवळ तिसरा आणि चौथा कसोटी सामना खेळू शकणार आहे. कसोटी संघात स्थान मिळाल्यानंतर रोहित भारतच्या उर्वरित संघासह ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल असे मानले जात होते, पण सर्वांना चकित करत रोहित ऑस्ट्रेलियामध्ये टीमबरोबर नव्हता. बीसीसीआयने नंतर एका निवेदनाद्वारे पुष्टी केली की आयपीएलनंतर आपल्या आजारी वडिलांची भेट घेण्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार घरी गेला होता. रोहित एका आठवड्यानंतर बेंगलोरमधील एनसीएमध्ये गेला आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ‘क्लिनिकली फिट’ पास होण्यापूर्वी त्याच्या फिटनेसवर काम केले. (IND vs AUS 1st Test: स्टीव्ह स्मिथच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने दिला मोठा अपडेट, पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी पाहा काय म्हणाला)
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 33 वर्षीय रोहितने ऑस्ट्रेलियाचा प्रवास करताना स्वत:चा एक फोटो शेअर केला. फोटोत रोहितने थंब्स-अप दाखवत सेल्फी क्लिक केली. मंगळवारी पहाटे तो ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. एएनआयने एका सूत्रांच्या माहितीनुसार, “रोहित आज पहाटेच निघून दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.” तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांत निवडीसाठी उपलब्ध होण्यासाठी रोहित ऑस्ट्रेलिया येथे वेळेवर पोहोचला आहे. रोहितने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेले फोटो पहा:

सध्या भारतीय फलंदाज क्वारंटाइन राहत ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीशी जुळवून घेईल आणि नुकत्याच झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या त्याच्या फिटनेसवरही काम करेल. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होईल आणि नियोजनानुसार निवड झाल्यास रोहित त्या सामन्यात मयंक अग्रवालसह सलामीला येऊ शकतो. आयपीएल दरम्यान त्याला दुखापत झाल्यावर दौऱ्यावर त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. डाऊन अंडर दौऱ्यासाठी त्याचा कसोटीसह मर्यदित ओव्हरच्या मालिकेतही समावेश झाला नव्हता, पण रोहितचा उशिरा कसोटी संघात समावेश झाला आणि निवड समितीने अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध असल्याचे सांगितले.