IND vs AUS 2020-21: विराट कोहलीने चांगली सुरुवात न करुन दिल्यास भारतीय संघावर टेस्ट सिरीज 4-0 ने गमावण्याची नामुष्की येईल, माइकल क्लार्कचे मोठे विधान
टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा (India Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मायदेशी परतण्यापूर्वी मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला लय मिळवून देण्यास अपयशी ठरला तर संघाला कसोटी मालिकेत 4-0ने पराभवाला सामोरे जावे लागेल असा इशारा ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार माइकल क्लार्कने (Michael Clarke) दिला आहे. कोहलीला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी बीसीसीआयने (BCCI) पितृत्व राजा दिली आहे आणि तो वनडे, टी-20 मालिका आणि कसोटी सामन्यातील पहिला सामना खेळून भारत परतणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना अ‍ॅडिलेड येथे खेळला जाईल. पहिला सामनाजो दिवस/रात्र असणार आहे. क्लार्कने मंगळवारी स्काय स्पोर्ट्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "विराट कोहली एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात पुढाकाराने नेतृत्व करू शकतो. जर एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात भारताला यश मिळालं नाही तर कसोटी सामन्यांमध्ये त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल आणि माझ्या मते त्यांना 0-4 ने पराभव पत्करावा लागेल." (IND vs AUS 2020-21: स्टीव्ह स्मिथला आऊट कसे करावे? सचिन तेंडुलकरने भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी गोलंदाजांना दिले टिप्स)

केवळ एक कसोटी सामना खेळला असला तरी मर्यादित षटकांच्या मालिकेत वर्चस्व राखून हा करिष्माई भारतीय कर्णधार कसोटी मालिकेच्या निकालामध्ये मोठी भूमिका बजावू शकतो असे क्लार्कचे मत आहे. तो म्हणाला, "मला वाटते की या संघाला तो जो लय देईल तो पहिल्या कसोटीनंतर बाहेर पडल्यावर मोठी भूमिका बजावेल." जगातील दोन सर्वोत्कृष्ट संघांमधील बहुप्रतिक्षित मालिकेची सुरुवात सिडनी येथे 27 नोव्हेंबर रोजी पहिल्या वनडे सामन्याने होईल. ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार क्लार्क म्हणाला की, या मालिकेत जसप्रीत बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल आणि या स्टार वेगवान गोलंदाजाला आक्रमक गोलंदाजी करून यजमान संघावर दबाव आणावा लागेल. सलामीवीर डेविड वॉर्नरला त्रास देण्यासाठी बुमराहला यश आले असून स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही अस्वस्थ करण्याची क्षमता त्याच्यात आहे असेही क्लार्कने म्हटले.

टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वात 2018-19 मध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकून भारताने इतिहास रचला. त्या मालिकेत यजमान संघ बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या स्मिथ आणि वॉर्नर या स्टार फलंदाजांशिवाय 2018 मध्ये मैदानावर उतरले होते.