Australia National Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून (Border-Gavaskar Trophy 2024-25) सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना पर्थ (Perth) येथे होणार आहे. भारताने गेल्या दोनदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे. भारताने 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता टीम इंडिया हॅट्ट्रिक करणार आहे. ही जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. मात्र, पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. त्याची पत्नी रितिका हिने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे पर्थ कसोटीत रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारतीय संघाची नजरा डब्ल्यूटीसी फायनलकडे
भारताने या मालिकेतील चार कसोटी सामने जिंकल्यास ते थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहचतील. ऑस्ट्रेलियन संघालाही या मालिकेत विजयाची नोंद करायची आहे. ऑस्ट्रेलियाने 2014-15 पासून भारताला मायदेशात कसोटी मालिकेत हरवलेले नाही. गेल्या वर्षी, दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये आमनेसामने होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने दोन्ही वेळा ट्राॅफी नावावर केली.
हे देखील वाचा: IND vs AUS 1st Test 2024: नाणेफेक ठरवेल पर्थमधील सामन्याचा निकाल! गोलंदाजी किंवा फलंदाजी, दोन्ही संघांना प्रथम काय करायला आवडेल?
पर्थमधील हवामान परिस्थिती
22 नोव्हेंबरला पर्थमध्ये वातावरण आल्हाददायक असेल. अंशतः ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता नाही. तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. वाऱ्याचा वेग ताशी 17 किलोमीटर असेल आणि वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे असेल. आर्द्रता पातळी 52% असेल आणि पावसाची शक्यता खूपच कमी आहे. ढगांचे आच्छादन 57% असेल आणि दृश्यमानता 10 किलोमीटर असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, रविचंद्रन, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.