ईशांत शर्मा (Photo Credit: IANS)

IND vs AUS 1st Test: दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यानंतर पाच वेळा ऑस्ट्रेलियाचा (Australia) दौरा करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) दुसरा भारतीय क्रिकेटपटू बनू शकला असता, पण आता तो ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील दौर्‍यावर इशांतने 68 टक्के ऑस्ट्रेलियन विकेट घेतल्या होत्या. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्येही खेळला नव्हता आणि आता तो ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कसोटी संघातूनही त्याला बाहेर बसावे लागत आहे. इशातच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला (Team India) उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांच्यात निवड करावी लागेल. इशांतने ऑस्ट्रेलियामध्ये 13 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये 31 विकेट्स घेतल्या आहेत. भारताला कसोटी मालिकेत इशांतची कमतरता जाणवेल असे ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ गेल्या आठवड्यात म्हणाला होता. (IND vs AUS 1st Test: अ‍ॅडिलेड टेस्ट मॅचसाठी संजय मांजरेकर यांनी निवडला भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन; शुभमन गिल ओपनर तर 'हा' बनला विकेटकीपर)

भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मंगळवारी स्मिथचे समर्थन केले आणि म्हटले की, "इशांत अत्यंत ज्येष्ठ वेगवान गोलंदाज असल्याने नक्कीच त्याची कमतरता जाणवेल. त्याने म्हटले की असे असूनही भारताकडे चांगले पर्याय आहेत. रहाणे म्हणाले, "मला वाटते की आमच्याकडे खरोखरच मजबूत गोलंदाजी हल्ला आहे. उमेश, सैनी, सिराज, बुमराह आणि शमी हे सर्व चांगले गोलंदाज असून त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यांना इथे कशी गोलंदाजी करायची हे माहित आहे. हे सर्व गोलंदाजीची भागीदारी आहे. तुम्हाला माहित आहे की आम्ही गेल्या वेळी इथे चांगली गोलंदाजी केली होती. ही एक नवीन मालिका आहे जी गुलाबी बॉलपासून सुरू होईल. लय मिळवणे गरजेचे आहे. आमचे गोलंदाज 20 विकेट घेऊ शकतात असा माझा विश्वास आहे."

इशांतच्या अनुपस्थितीत उमेशबरोबर पहिल्या कसोटीत खेळू शकतो असे संकेत रहाणेने दिले. उमेश दुसर्‍या सराव सामन्यात खेळला नव्हता, पण पहिल्या सराव सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या. त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर जो बर्न्स आणि कर्णधार टिम पेन यांना बाद केले.