IND vs AUS 1st Test: अ‍ॅडिलेड टेस्ट मॅचसाठी संजय मांजरेकर यांनी निवडला भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन; शुभमन गिल ओपनर तर 'हा' बनला विकेटकीपर
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

IND vs AUS 1st Test: माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी गुरुवार, 17 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड कसोटीसाठी भारताच्या संभावित प्लेइंग इलेव्हनची (India Probable Playing XI for Adelaide Test) शक्यता वर्तवली आहे. मांजरेकर यांनी ट्विटरवर संभावित प्लेइंग इलेव्हन शेअर केला आहे. ज्यानुसार पृथ्वी शॉ आणि केएल राहुल यांच्यापुढे मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) सलामी जोडीदार म्हणून भारत शुभमन गिलला (Shubman Gill) संधी देऊ शकतो असे मांजरेकरांचे मत आहे. तर विकेटकीपर म्हणून रिद्धिमान साहाच्या वर रिषभ पंतची (Rishabh Pant) माजी मुंबईकर फलंदाजाने निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध पिंक-बॉल सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीला मांजरेकरांनी सहाव्या स्थानावर संधी दिली आहे. फलंदाजी व्यतिरिक्त ऑफ स्पिनर म्हणून विहारी संघाच्या कामी येऊ शकतो. अ‍ॅडिलेड कसोटीसाठी अन्य खेळाडूंची सहाजिकच निवड होते. (IND vs AUS 1st Test: विराट कोहलीच्या रडारवर सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग यांचे विक्रम; माजी Aussie कर्णधाराला पछाडत वर्ल्ड रेकॉर्डची संधी)

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडी मधल्या फळीत कामगिरी करताना दिसतील. काही विश्लेषक अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनऐवजी डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्याच्या समर्थन देत आहेत, मात्र मांजरेकरांनी अनुभवी फिरकीपटूची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मांजरेकरना वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांची अपेक्षा आहे. दरम्यान, पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया दोन तंदुरुस्त सलामी जोडी शोधण्यासाठी झगडत आहे तर पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियापुढे देखील अशीच डोकेदुखी आहे. ऑस्ट्रेलियात ओपनिंग ही एक महत्त्वपूर्ण स्थिती आहे कारण खराब सुरुवात केल्यामुळे भारतीय मधली फळी धोकादायक ऑस्ट्रेलियाच्या नवीन बॉलर्सपुढे उघडकीस येऊ शकते. दरम्यान, या सामन्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी रवाना होणार असल्याने भारतीय संघ मालिकेची सकारात्मक सुरुवात करून आघाडी घेण्याच्या निर्धारित असेल.

पहा संजय मांजरेकर यांचा संभावित प्लेइंग इलेव्हन: मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), हनुमा विहारी, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.