IND vs AUS 1st Test Day 2: पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डाव 191 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन (Tim Paine) नाबाद 74 धावा करून परतला. तर मार्नस लाबूशेनने (Marnus Labuschagne) 47 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 विकेट गमावून 9 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 62 धावांची आघाडी घेतली. भारताकडून दुसऱ्या डावात सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा अपयशी ठरला. पृथ्वीला 4 धावाच करता आल्या. मयंक अग्रवाल आणि नाईट-वॉचमन जसप्रीत बुमराह नाबाद परतले. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात पॅट कमिन्सने (Pat Cummins) पृथ्वीला बाद करत पहिले यश मिळवून दिले. यापूर्वी, भारताने पहिल्या डावात 244 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून एकूण 15 विकेट पडल्या. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत कांगारू संघाला आघाडी घेऊ दिली नाही मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन याने अर्धशतकी खेळी करत डाव सावरला आणि संघाची धावसंख्या 191 पर्यंत नेली. (IND vs AUS 1st Test Day 2: टिम पेनची अर्धशतकी खेळी, टीम इंडिया गोलंदाजांच्या माऱ्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर गडगडला)
अॅडिलेडमध्ये (Adelaide) खेळल्या जाणार्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात भारताने 244 धावा केल्या होत्या आणि दुसर्या दिवशी यजमान संघ 191 ऑलआऊट करत अशाप्रकारे, टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध 53 धावांची आघाडी घेतली. मॅचच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने 6 विकेट गमावून 233 धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघाने केवळ 11 धावांवर 4 गडी गमावले आणि टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून पुन्हा एकदा मयंक अग्रवाल आणि पृथ्वीच्या जोडीने सुरुवात केली. मात्र, कमिन्सच्या पुन्हा आत येणाऱ्या चेंडूवर पृथ्वी क्लीन-बोल्ड होत माघारी परतला.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पेनसह लाबूशेनने महत्तवपूर्ण खेळी केली. लाबूशेन आघाडीचा एकमेव फलंदाज होता ज्याने दुहेरी धावसंख्या गाठली. जो बर्न्स, मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. ट्रेव्हिस हेड आणि पदार्पणाचा सामना खेळणारा कॅमरुन ग्रीन प्रभावी कामगिरी करू शकले नाही. मिचेल स्टार्कने 15 तर नॅथन लायनने 10 धावा केल्या. लाबूशेन माघारी परतल्यावर कर्णधार पेनने संयमी खेळी करत अर्धशतक ठोकले व संघाचा डाव सावरत भारताला मोठी आघाडी घेऊ दिली नाही.