भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेमधील पहिला सामना मुंबईत खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 255 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि आरोन फिंच (Aaron Finch) यांच्या शतकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने विजय मिळवला. गोलंदाजांनंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनीही संघासाठी शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पिछाडीवर टाकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी वॉर्नर आणि फिंचनी एकतर्फी विजय मिळविला. दोघांनी शतकी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला पहिल्यांदा मोठा पराभव पत्करावा लागला. आता दोन्ही संघ राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील.  (IND vs AUS 1st ODI: डेविड वॉर्नर-आरोन फिंच यांनी उडवला भारताचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाचा 10 विकेटने विजय)

या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. जाणून घ्या:

1. वॉर्नरने वनडे कारकीर्दीच्या 118 व्या डावात 5000 धावा पूर्ण केल्या. कमी डावात ही कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. 117 सामन्यांच्या 115 डावांमध्ये पाच हजार धावांचा विक्रम आता वॉर्नरच्या नावावर आहे.

2. धवनने 74 धावांची खेळी केली आणि वनडे क्रिकेटमधील हे त्याचे 28 वे अर्धशतक आहे. यासह त्याने 17 शतकंही केली आहेत.

3. वॉर्नर आणि फिंचने पहिल्या विकेटसाठी 258 धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमधील ही 9वी वेळ आहे जेव्हा दोघांनी शतकी भागीदारी रचली. यासह, ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी म्हणून जास्तीत जास्त शतकी भागीदारीच्या बाबतीत गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ यांच्या जोडीच्या 8 शतकी भागीदारीला दुसर्‍या क्रमांकावर ठकलले आहे.

4. वॉर्नरने 128 धावा फटकावल्या. वनडे कारकिरीडीतील हे त्याचे 18 वे शतक आहे. त्याने 88 चेंडूत शतक पूर्ण केले.

5. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 विकेट ने पराभवाला सामोरे जावे लागले आणि ही फक्त पाचवी वेळ आहे. यापूर्वी 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध संघाचा 10 विकेटने पराभव झाला होता.

6. भारताविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी 1997 मध्ये स्टुअर्ट विल्यम्स आणि शिव चंद्रपोल यांच्यात नाबाद 200 धावांची भागीदारी झाली होती.

7. ऑस्ट्रेलियाकडून वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याच्या बाबतीत वॉर्नर संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मार्क वॉ यांनीही 18 शतकं ठोकली आहे. रिकी पाँटिंग 29 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

8. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचनेही वनडे क्रिकेटमधील 16 वे शतक झळकावले. भारताविरुद्धचे हे त्याचे तिसरे शतक आहे.

9. वॉर्नर आणि फिंचमध्ये झालेली 258 धावांची भागीदारी भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम गॅरी कर्स्टन आणि हर्षल गिब्बल यांच्या नावे नोंदविण्यात आला होता. 2000 मध्ये कोचीमध्ये त्यांनी 235 धावांची भागीदारी केली होती.

10. अ‍ॅडम झांपाने विराट कोहलीविरुद्ध चांगली कामगिरी कायम ठेवली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कोहलीला झांपाने चौथ्यांदा वनडे सामन्यात कोहलीला बाद केले, जे भारतीय कर्णधारविरूद्ध फिरकीपटूसाठी संयुक्तपणे सर्वाधिक आहे. 50 षटकांच्या चार सामन्यात कोहलीला चारवेळा बाद करणारे अन्य दोन फिरकीपटू ग्रेम स्वान आणि सूरज रणदीव आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करताना भारतीय संघ 49.1 षटकांत 255 धावांवर ऑलआऊट झाला. शिखर धवन याने 74 आणि केएल राहुल याने 47 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांशिवाय कोणताही भारतीय खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने 3, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.