अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 1st ODI: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात यजमान संघाचा कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) खेळल्या जाणार्‍या आजच्या सामन्यात कमेंटरी करताना माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) यांच्याकडून मोठी चूक झाली ज्यामुळे त्यांना दोन भारतीय गोलंदाजांची माफी मागावी लागली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरुवात होण्यापूर्वी, भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) वडिलांचं निधन झालं. पण, Fox Sports वाहिनीवर कमेंटरी करणाऱ्या गिलक्रिस्टने सिराजऐवजी नवदीप सैनीच्या (Navdeep Saini) वडिलांचं निधन झालं असा चुकीचा दाखला दिला. ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने सिराज आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सामील झाला नव्हता आणि त्यांनी बीसीसीआयला आपला निर्णयही कळवळा. ट्विटरवर गिलक्रिस्टला त्याच्या चुकीने भारतीय क्रिकेट चाहत्यांनी लक्ष वेधले. (IND vs AUS 1st ODI: शतकवीर आरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ यांचे वर्चस्व, टीम इंडियाच्या गलथान फिल्डींगमुळे ऑस्ट्रेलियाने उभारला 374 धावांचा डोंगर)

तथापि, आपली चूक लक्षात येताच गिलक्रिस्टने ट्विटरवर दोन्ही भारतीय वेगवान गोलंदाजांची त्वरित दिलगिरी व्यक्त केली. एका ट्विटर यूजरच्या पोस्टला प्रतिसाद देताना गिलक्रिस्टने लिहिले, “हो, धन्यवाद@anshu2912. मी माझ्या उल्लेखात चुकलो हे मला जाणवले. माझ्या चुकांबद्दल नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज दोघांनाही दिलगीर आहे.” पाहा गिलक्रिस्टच्या चुकीच्या कमेंटरीचा व्हिडिओ

दुसरीकडे, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि 374 धावांचा डोंगर उभारला. आरोन फिंच आणि डेविड वॉर्नरच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी झाली. वॉर्नर आणि कर्णधार फिंचच्या पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. फिंचने सर्वाधिक 114, स्टिव्ह स्मिथ 105 आणि वॉर्नरने  69 धावा केल्या. आजच्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी निराशाजनक कामगिरी समोर आली. त्यांनी अनेक झेल सोडले ज्याच्या फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.  टीम इंडियासाठी मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सलामी फलंदाज म्हणून मयंक अग्रवालला संधी दिली आहे, तर नवदीप सैनीचा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.