IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 11 जानेवारी रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 14 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. आता टीम इंडियाची नजर दुसरा टी-20 सामना जिंकून मालिका जिंकण्यावर असेल. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इंदूरमध्ये होणारा दुसरा टी-20 हा अफगाणिस्तानसाठी लढो किंवा मरो असा सामना असणार आहे. (हे देखील वाचा: NZ Beat PAK 2nd T20: न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 21 धावांनी केला पराभव, गोलंदाजाचा घातक मारा)
आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम:
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 2000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 17 धावांनी कमी आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (82) याला आरोन फिंच (82) आणि इऑन मॉर्गन (86) यांना मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनण्यासाठी पाच षटकारांची गरज आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण करण्यासाठी चार विकेट्सची गरज आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यासाठी पाच विकेट्सची गरज आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा आकडा गाठण्यापासून पाच विकेट दूर आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी 147 धावांची गरज आहे.
अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज नजीबुल्लाह झद्रानला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करण्यासाठी सात षटकारांची गरज आहे.
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी पाच षटकारांची गरज आहे.
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीलाही क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 200 षटकार पूर्ण करण्यासाठी पाच षटकारांची गरज आहे.
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज करीम जनात टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यापासून तीन विकेट दूर आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 5 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तान संघाला अद्याप टीम इंडियाविरुद्ध एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा आहे.