IND-U19 vs SA-U19 World Cup 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहणार?
भारताचा U19 संघ (Photo Credit: PTI)

U19 World Cup 2022 Live Streaming: वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) 14 जानेवारीपासून आयसीसी अंडर-19 विश्वचषक (ICC U19 World Cup) स्पर्धेची 14 वी आवृत्ती सुरु झाली आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने 22 जानेवारीपर्यंत खेळवले जातील. 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद जिंकणारा भारतीय संघ (Indian Team) आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याशिवाय 2016 मध्ये तो उपविजेता ठरला होता. ICC अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये युवा टीम इंडियाचा पहिला सामना आज, 15 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. स्पर्धेपूर्वी आशिया चषक जेतेपद जिंकणारी टीम इंडिया  (Team India) पाचवे चॅम्पियनशिप जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. भारत अंडर-19 विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 वर्ल्ड कप सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (U19 World Cup 2022: पाचव्या अंडर-19 चॅम्पियनशिपसाठी भारताचे यंगस्टर्स सज्ज, प्रशिक्षकाने उघड केली खास रणनीती)

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2022 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केले जाईल. तसेच Disney+ Hotstar वर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. वेस्ट इंडिजमध्ये गयाना येथे खेळल्या जाणाऱ्या ICC अंडर-19 विश्वचषक 2022 मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघ खालीलप्रमाणे आहे.

भारत अंडर-19 संघ: यश धुल्ल (कॅप्टन), हरनूर सिंह, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्‍वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गरव सांगवान, दिनेश बाना, आराध्य यादव, राज बावा, वासू वत्स, रवी कुमार.

दक्षिण आफ्रिका अंडर-19 संघ: जॉर्ज व्हॅन हेर्डन (कॅप्टन), लियम अल्डर, मॅथ्यू बोस्ट, देवाल्ड ब्रेव्हिस, मिकी कोपलँड, इथन जॉन कनिंगहॅम, व्हॅलेंटाइन किटाईम, क्वेना मफाका, गेरहार्ड मारी, अफिवे एमएनयांडा, अँडिले सिमेलेन, जेड स्मिथ, जोशुआ स्टीफन्सन, काडेन सोलोमन, असाखे त्शाका.