आयपीएलच्या हंगामातील आजचा 9 सामना राजस्थान रॉयल विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (RR Vs KXIP) यांच्यात पार पडला आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघाने पंजाबच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत केले आहे. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानात फलंदाजी करण्यासाठी आलेले पंजाबचे सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 223 धावांचा डोंगर उभा केला. यामुळे राजस्थानच्या संघाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरला की काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, या सामन्यान राजस्थानच्या संघाने तुफान फलंदाजाने चांगलीच झुंज दिली. परंतु, राहुल तेवतियाची (Rahul Tewatia) आक्रमक खेळी अवस्मरणीय ठरली आहे.
राजस्थान रॉयलच्या विजयानंतर सोशल मीडियावर राहुल तेवतिया या खेळाडूची अधिक चर्चा आहे. मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन बाद झाल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या 18 व्या षटकात तेवतियाने 5 षटकार खेचले आणि सामन्याचे चित्रच पालटलून टाकले. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेले राजस्थान एकदम आघाडीवर आले. ज्यामुळे राजस्थानच्या संघाला पंजाबच्या संघावर सहज विजय मिळवता आला आहे. हे देखील वाचा- RR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवालचा RRवर हल्लाबोल, पॉवर-प्लेमध्ये केल्या पंजाबने केल्या सर्वाधिक धावा; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
पाहा व्हिडिओ-
आजच्या सामन्यात चाहत्यांना बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. सुरुवातीला हा सामना पंजाबच्या संघाकडे झुकताना दिसत होता. मात्र, पंजाबच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानचा संघाने आक्रमक खेळी केली. मात्र, स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांच्या बाद झाल्यानंतर सामना पुन्हा पंजाबकडे झुकला. त्यानंतर मैदनात असलेल्या राहुल तेवतिया याने तडाखेबाज फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.