RR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवालचा RRवर हल्लाबोल, पॉवर-प्लेमध्ये केल्या पंजाबने केल्या सर्वाधिक धावा; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
केएल राहुल, मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांनी टीमला जबरदस्त सुरुवात करून दिली. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने शारजाह (Sharjah) येथील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण राहूल आणि मयंकने तो निर्णय चुकीचा ठरवला. किंग्ज इलेव्हन पंजाबला 9 ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार करून देत मयंकने 26 चेंडूत अर्धशतक केले तर केएल राहुलने चौकार आणि षटकारांच्या मदतीने फटकेबाजी केली. या दरम्यान, कर्नाटकच्या मयंक-राहुलच्या जोडीने या मोसमात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली. पहिल्या पॉवरप्लेच्या अखेरीस किंग्ज इलेव्हन पंजाबने शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) 60/0 धावा केल्या. यादरम्यान, राहुलने फाफ डू प्लेसिसच्या धावांचा टप्पा ओलांडत ऑरेंज कॅपवर पुन्हा कब्जा केला. (RR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवाल यांचा 'दे घुमा के! शारजाहवर पडला चौकार-षटकारांचा पाऊस, RR समोर 224 धावांचे विशाल आव्हान)

दरम्यान, सोशल मीडियावर राहुल आणि मयंकच्या या विक्रमी दवाचे भरपूर कौतुक केले जात आहे. मयंक आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर दोन्ही भारतीय फलंदाजांनी यूजर्सच्या भरपूर टाळ्या मिळवल्या. मयंक अग्रवालने 50 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी केली, तर संघाचा कर्णधार राहुलने 54 चेंडूत 69 धावांचा डाव खेळला आणि टीमची धावसंख्या 200 पार नेण्यात मोठो भूमिका बजावली. पाहा राहुल आणि मयंकच्या विक्रमी डावावर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

आरसीबी वि केएक्सआयपी

स्टिव्ह स्मिथ

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल

मयंक अग्रवाल

आणखी एक

मिम

राहुल आणि मयंकने 'पॉवर-प्ले'मध्ये राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि मैदानात चौफेर फटकेबाजी केली. याशिवाय, मयंकने या सामन्यात आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या, तर मोसमातील दुसऱ्या शतकाची नोंद केली. मयंकने 50 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकार लगावत मयांकने 106 धावा केल्या. यापूर्वी, राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 132 धावांचा डाव खेळला.