
RR vs RCB, IPL 2024 Eliminator: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल तर विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहोचेल. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स जोही संघ हरेल, त्यांचा सामना दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ क्वालिफायर 2 खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहायचे आहे.
दोन्ही संघांची आकडेवारी
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघ 2 सामन्यात आमनेसामने आले होते आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दोन्ही सामने जिंकले होते. दोन्ही संघांमधील सर्वोच्च धावसंख्या (217) आणि सर्वात कमी धावसंख्या (58) होती. हे दोन्ही स्कोअर राजस्थान रॉयल्सने केले आहेत. (हे देखील वाचा: RCB vs RR Pitch And Weather Report: एलिमिनेटरमध्ये आज बंगळुरु-राजस्थान आमनेसामने, वाचा कसे असेल हवामान आणि खेळपट्टी अहवाल)
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला 50 झेल पूर्ण करण्यासाठी तीन झेल हवे आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 50 झेल पूर्ण करण्यासाठी आणखी तीन झेल आवश्यक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा घातक गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच विकेट्सची गरज आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 29 धावांची गरज आहे.