IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) होणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारताला हा सामना जिंकून विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाला हरवणे इतके सोपे नसेल. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होणार असल्याचे मानले जात आहे. या विश्वचषकापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज शुभमन (Shubman Gill) गिल डेंग्यूमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते पाहूया.. (हे देखील वाचा: IND vs AUS World Cup 2023 Weather Report: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे होणार खराब, जाणून घ्या रविवारी कसे असेल चेन्नईचे हवामान?)

गिलच्या जागी ईशानला मिळणार सलामीची संधी 

शुभमन गिल पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी इशान किशनचा संघात समावेश होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि इशान किशन भारतासाठी सलामी करताना दिसणार आहेत. पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येईल. त्याचबरोबर केएल राहुलही फॉर्ममध्ये दिसत असल्याने त्याचाही संघात समावेश होणार आहे. या 4 पैकी कोणतेही 2 फलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करू शकले तर टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारू शकते.

बुमराह गोलंदाजीत कहर करण्यास तयार 

जसप्रीत बुमराह आणि सिराज प्रामुख्याने भारताची गोलंदाजी सांभाळताना दिसतील. त्याचवेळी शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या मालिकेत अनेक विक्रमही केले. अशा स्थितीत भारताची गोलंदाजीही मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघाचे नेतृत्व करतील.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.