ICC WTC Final: साऊथॅम्प्टनच्या मैदानात उतरताच तुटणार टीम इंडियाची परंपरा, 89 वर्षाच्या इतिहासात पहिल्याच असं घडणार
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC WTC Final: 12 कसोटी खेळणार्‍या संघांपैकी फक्त भारत (India) आणि बांग्लादेश संघाने तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेला नाही, परंतु पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) जेव्हा टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी रोस बाउल (Rose Bowl) मैदानात उतरेल तेव्हा तो तब्बल 89 वर्षांच्या कसोटी इतिहासातील तटस्थ ठिकाणी त्यांचा पहिला कसोटी सामना असेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) येथे होणार असून ते दोन्ही देशांसाठी तटस्थ स्थळ असेल. शिवाय, पाकिस्तानमधील सुरक्षेचा धोका लक्षात घेता, एका दशकापेक्षा जास्त काळ परदेशी संघ तेथे गेले नाहीत. अशास्थितीत पाकिस्तानने घरातील सामने युएई आणि श्रीलंका येथे खेळले आहे. (ICC WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर या 3 भारतीय खेळाडूंच्या कसोटी क्रिकेट करिअरवर लागू शकतो ब्रेक)

अशाप्रकारे पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळणार्‍या बहुतेक संघांना तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये न्यूझीलंडचा समावेश आहे, ज्यांनी 2014 ते 2018 पर्यंत तटस्थ ठिकाणी सहा सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यात त्यांनी विजय मिळवला असून 2 सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2007 पासून एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही. तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ जगातील 11वा संघ ठरेल. डाऊन अंडर मजबूत ऑस्ट्रेलियाविरुध्द विजय मिळवून त्यानंतर आशिया खंडात इंग्लंडला घरातील सलग तीन सामन्यात विजय मिळवण्याचा संघाकडे आत्मविश्वास असेल. पण केन विल्यमसन आणि किवी टीमने नेहमीच कोहलीच्या संघावर सर्वच गाजवून समस्या निर्माण केली आहे आणि ही संघासाठी आणखी एक कठीण परीक्षा असेल.

दरम्यान, गेल्या 20 वर्षांत पाकिस्तानने युएई येथे घरातील बहुतेक सामने खेळले आहेत. हेच कारण आहे की तटस्थ ठिकाणी सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत तटस्थ ठिकाणी 39 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 19 जिंकले आहेत आणि 12 सामानाने गमावले आहेत. तसेच उर्वरित आठ सामने अनिर्णित राहिले आहेत.