ICC WTC Final 2021: फायनलमध्ये 'या' खेळाडूंवर असणार सर्वांची नजर, भारत-न्यूझीलंड संघात रंगणार काट्याची टक्कर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सुरू होणार आहे. कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याला आता काही दिवस शिल्लक असताना चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अंतिम सामन्यासाठी 15 खेळाडूंना टीम इंडियाच्या (Team India) संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान कोणत्या संघाला मिळणार याची चाहत्यांनाही उत्सुकता लागून आहे. गेल्या दोन वर्षांत डब्ल्यूटीसी स्पर्धे दोन्ही संघातील धुरंधर खेळाडूंकडून बरीच उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली आहे त्यामुळे आता ब्लॉकबस्टर फायनल सामन्यात देखील त्यांच्याकडून अशीच अपेक्षा राहील. (ICC WTC Final 2021: फायनल सामन्यात शॉर्ट बॉल बनणार Virat Kohli याची कमजोरी, पाहा व्हिडिओ)

भारतीय संघात बरेच तडाखेबाज खेळाडू आहेत, जे स्वबळावर सामन्याचा निकाल बदलू शकतात. त्यामुळे, शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाला या खेळाडूंकडून मोठ्या आशा आहेत आणि प्रेक्षकांची नजरही त्यांच्यावर असणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli)

सध्या विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. कोहलीकडे केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर संघाचा महत्त्वाचा फलंदाज म्हणूनही मोठी जबाबदारी असेल. तसेच कोहलीकडे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून स्वत: ला सिद्ध करण्याची संधी असेल. या सामन्यात टीम इंडिया  बरोबरच कोहलीकडेही विश्वविक्रम करण्याची संधी असेल.

रिषभ पंत (Rishabh Pant)

पंतने गेल्या दोन वर्षांत खूप चांगले काम केले आहे. गेल्या 6 महिन्यांत युवा विकेटकीपर-फलंदाज भारतीय संघाचा ट्रम्प कार्ड बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत त्याने प्रभावी कामगिरी होती. पंतची विकेटकीपिंग शैलीही सुधारली आहे. डब्ल्यूटीसीमध्ये पंतने 41.37 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहे आणि विजेतेपद जिंकण्यासाठी संघ त्याच्यावर अवलंबून असेल.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

क्रिकेटच्या सर्व स्वरूपातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू जडेजाने डब्ल्यूटीसीमध्ये शानदार प्रदर्शन केले आहेत. जडेजाने 58.62 च्या सरासरीने 469 धावा केल्या तसेच त्याने गोलंदाजीत 28.7 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या. फलंदाजी आणि चेंडूशिवाय जडेजा क्षेत्ररक्षणातही खूप चपळ आहे. सर्वांची नजर जडेजावरही असेल.