ICC WTC Final 2021: फायनल सामन्यात शॉर्ट बॉल बनणार Virat Kohli  याची कमजोरी, पाहा व्हिडिओ
विराट कोहली WTC फायनल बाउंसर (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC WTC Final 2021: साउथॅम्प्टन (Southampton) येथे न्यूझीलंड (New Zealand) विरोधात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जोरदार सराव करत आहे. भारतीय संघाने (Indian Team) फायनलपूर्वी एक सराव सामना देखील खेळला ज्यानंतर टीम इंडियाने आता नेट्समध्ये सराव सुरु केला आहे. 18 जूनपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी एक व्हिडिओ सामायिक केला असून यामध्ये कोहली, रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांची ऐतिहासिक लढतीची तयारी दिसत आहेत. नेट्समध्ये सराव करताना कर्णधार कोहली आक्रमकपणे शॉट्स लावताना दिसला. त्याने आपला ट्रेडमार्क कव्हर ड्राइव्हदेखील खेळला तथापि, बाउन्सरला डक देताना त्याने आपला तोल गमावला तो खेळपट्टीवर पडला. (ICC WTC Final 2021: फायनल सामन्यासाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, Kane Williamson चे हे खेळाडू करणार टीम इंडियाशी दोन हात)

शॉर्ट बॉल खेळताना कोहली अस्वस्थ दिसत होता. अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ही त्याची कमजोरी सिद्ध होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किवी गोलंदाज सुरुवातीला कोहलीला शक्य तितके अधिकाधिक शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करतील कारण कोणत्याही फलंदाजाला डावाच्या सुरूवातीला फलंदाजी करण्यात अडचण येते आणि जेव्हा खेळपट्टी इंग्लंडची असते व तेथे न्यूझीलंडचे धोकादायक वेगवान गोलंदाज समोर असतात तेव्हा तो धोका अधिक वाढतो. तसेच व्हिडिओमध्ये पंत देखील जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर त्याने शानदार फटका खेळला. याशिवाय त्याने मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माच्या चेंडूंवर चांगला डिफेन्सही केला. भारतीय संघ 3 जून रोजी साऊथॅम्प्टनला पोहोचला असून तीन दिवस क्वारंटाईननंतर खेळाडूंनी सराव सुरू केला.

दरम्यान, नुकतंच न्यूझीलंड संघाने फायनल सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. केन विल्यमसन आणि बी. जे. वॅटलिंग दुखापतीनंतर अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. दोघे इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसले होते.