World Test Championship: भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) मोलाचा सल्ला दिला आहे. देवने म्हटले की इंग्लिश परिस्थिती नेहमीच आव्हानात्मक असते आणि पंतने प्रत्येक चेंडूला मारण्याचा प्रयत्न करु नये. पंत आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो आणि विरोधी संघावर आक्रमक पवित्रा घेणे त्याला आवडते पण इंग्लंडमध्ये (England) त्याला त्याच्या नैसर्गिक वृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, असे देव म्हणतात. पंतला इंग्रजी परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे आणि तो 2018 च्या दौर्यावर खेळला होता. शिवाय, मालिकेच्या अंतिम कसोटी सामन्यात ओव्हलमध्येही त्याने शतक झळकावले होते. अशा प्रकारे, त्या कामगिरीमुळे त्याला आगामी दौर्यावर भरपूर आत्मविश्वास मिळेल. (World Test Championship 2021: न्यूझीलंड गोलंदाजांना टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती, किवी प्रशिक्षकाचे हे विधान आहे पुरावा)
मिड-डे शी बोलताना कपिल देव म्हणाले, “पंत जेव्हा तो संघात आला तेव्हापासून आतापर्यंत खूप परिपक्व क्रिकेटपटू दिसत आहे. त्याचे शॉट्स खेळण्यासाठी त्याच्याकडे अजून खूपच वेळ आहे आणि बहुधा त्याच्या स्ट्रोकची श्रेणी छान आहे. पण इंग्लंड आव्हानात्मक असेल. त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ घालवला पाहिजे आणि प्रत्येक चेंडूवर फटका मारण्यासाठी पाहू नये. आम्ही रोहित शर्माबद्दल असेच म्हणत होतो, ज्याने बरेच शॉट्स खेळले होते, परंतु तो बाहेर पडून बरेच वेळा आऊट व्हायचा. तेच आत रिषभ पंतच्या बाबतीत आहे. तो एक रोमांचक खेळाडू आहे आणि खूपच मूल्यवान देखील. मी त्याला इतकेच सांगतो की त्याच्या शॉट्सची श्रेणी उलगडण्यापूर्वी वेळ घे. इंग्लंड वेगळे आहे.”
दरम्यान, पंत गेल्या सहा महिन्यांत आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये 274 धावा केल्या आणि ऐतिहासिक गब्बा कसोटी सामन्यात नाबाद 89 धावांची खेळी साकारली. त्यानंतर घरच्या परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने 270 धावा केल्या. पंतच्याकडे विरोधी संघाकडून सामना खेचून आणण्याचे कौशल्य आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध WTC फायनल सामन्यात साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल येथे टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड असेल.