ICC WTC Final 2021: साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाऊल (Ageas Bowl) येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात बहुप्रतिक्षित आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी आता पाच दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या सामन्यात दोन्ही संघातील जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये शानदार लढत होणार हे निश्चित आहे. न्यूझीलंड संघात टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, काईल जेमीसन, नील वॅग्नर, एजाज पटेल, मॅट हेन्री से वेगवान गोलंदाज आहेत तर टीम इंडियाकडे (Team India) वेगवान आणि फिरकी विभागात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा असे मॅच-विनर गोलंदाज आहेत. दोन्ही संघात असे गोलंदाज आहेत जे एकहाती सामन्याचा निकाल बदलू शकतात. (ICC World Test Championship: साऊथॅम्प्टन क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची वाढणार चिंता? वाचा सविस्तर)
इशांत शर्मा (Ishant Sharma)
शर्मा गेल्या तीन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. दोन वर्षांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाने 20 डावात 17.36 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत. साऊथॅम्प्टनमध्ये खेळलेल्या एकमेव सामन्यात 32 वर्षीय इशांतने 2018 च्या कसोटी सामन्यात दोन डावांमध्ये 15.50 च्या सरासरीने एकूण 4 विकेट्स घेतल्या. इशांतला फायनल सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते असे वृत्त आहे पण सध्या सुरू असलेल्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात 3/36 आकडेवारीने त्याचे स्थान निश्चित करू शकते.
टिम साउदी (Tim Southee)
भारताविरुद्ध 2020 कसोटी सामन्यांच्या मालिकेत साउदीने 2 कसोटी सामन्यात 13.14 च्या सरासरीने सर्वाधिक 14 गडी बाद केले होते आणि कर्णधार विराट कोहलीविरुद्ध त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दहा वेळा विराटला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. साउदीचा आउटस्विंजर घातक आहे आणि जर परिस्थिती त्याच्या बाजूने असेल तर त्याची गोलंदाजी खेळणे कठीण होईल. साउदी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे . इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत अनुभवी किवी वेगवान गोलंदाजाने 7 इंग्लिश फलंदाजांना बाद केले आहे.
काईल जेमीसन (Kyle Jamieson)
2020 च्या घरच्या मोसमात जेमीसनने भारताविरुद्धच्या कसोटी कारकीर्दीची ब्लॉकबस्टर सुरुवात केली होती. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजाने 16.33 च्या सरासरीने एकूण 9 गडी बाद केले. इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात तीन विकेट्स घेतल्या.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
नेहमीप्रमाणे जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली आणि टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड असेल. इंग्लंडविरुद्ध 2018 साऊथॅम्प्टन कसोटी सामन्यात बुमराहने दोन डावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. पण चॅम्पियन वेगवान गोलंदाजाची शेवटच्या कसोटी मालिकेत किवींविरुध्द अनुभव संस्मरणीय राहिली नाही. न्यूझीलंडविरुद्ध 2020 मालिकेच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने 4 डावात 31 च्या सरासरीने फक्त 6 गडी बाद केले.
ट्रेंट बोल्ट (Trent Boult)
बोल्ट हा आधुनिक युगातील एक चांगला स्विंग गोलंदाज आहे आणि तो डावखुरा फलंदाज आहे ही बाब लक्षात घेता तो भारतीय फलंदाजीविरुद्ध नेहमीच धोकादायक ठरू शकतो. भारत विरुद्ध अखेरच्या कसोटी मालिकेदरम्यान बोल्ट दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. दोन सामन्यात डाव्या बोल्टने 19.36 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आणि विशेषत: सुरुवातीच्या काळात तो पुन्हा एकदा भारतीय अव्वल फलंदाजांविरुद्ध धोकादायक ठरू शकतो.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
अश्विन गेल्या 7-8 महिन्यांत कसोटी क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयात भारतीय संघाच्या ऑफस्पिनरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये त्याने 20 डावात 20.88 च्या सरासरीने 67 विकेट घेतल्या. तथापि, टीम इंडिया त्याला आणि रवींद्र जडेजा या दोघांना एकत्रित खेळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. अश्विन हा डावखुरा विरुद्ध संघातील सर्वात महान गोलंदाजांपैकी कदाचित एक आहे आणि कदाचित टीम मॅनेजमेंट त्याला खेळायला आवडेल.
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
सिराजने मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, परंतु अवघ्या 6 महिन्यांच्या अवधीत त्याने उमेश यादवची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा घेतली आणि मोहम्मद शमी सोबतही तेच करू शकेल आणि टीम मॅनेजमेंट सिराजला अंतिम सामन्यात खेळण्यास उत्सुक आहे आणि युवा गोलंदाजासाठी कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जातो हे पाहें उत्सुकतेचे ठरणार आहे. सिराज हा एक वर्क हॉर्स आहे, जो लांबलचक गोलंदाजी करू शकतो आणि सातत्याने एका जागी एक स्थान मिळवू शकतो. त्याने इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळला नसला तरी त्याला भारत A संघासाठी प्रथम श्रेणी खेळण्याचा अनुभव आहे.