ICC WTC Final 2021: साऊथॅम्प्टन (Southampton) येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) सामना करण्यासाठी भारतीय संघ (Indian Team) सज्ज होत आहे. त्यापूर्वी मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) फायनल सामन्यातील मॅच रेफरी आणि अंपायरांची नावे जाहीर केली आहेत. क्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि माइकल गफ मैदानावरील अंपायर असतील. रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) टीव्ही अंपायर असतील, तर अॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे इंग्लिश अंपायर रिचर्ड केटलबरो भारत विरुद्ध न्यूझीलंड डब्ल्यूटीसी फायनल (WTC Final) सामन्याचे थर्ड अंपायर आहेत. अनेक चाहत्यांना रिचर्ड केटलबरो सामील असलेल्या आयसीसीच्या बाद फेरीतील सामन्यादरम्यान कुप्रसिद्ध घटनांबद्दल माहित असतील. (ICC WTC Final सामन्यापूर्वी किवी संघासाठी धोक्याची घंटा; Kane Williamson जखमी, हा स्टार खेळाडू इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यातून आऊट)
केटलबरो आयसीसीच्या बाद फेरीत टीम इंडियासाठी अनेकदा अनलकी ठरले आहेत. त्यांनी जेव्हा-जेव्हा बाद फेरीत अंपायरिंग केली भारताला पराभवाचा धक्का सहनच करावा लागतो. भारतीय संघाच्या जवळपास सर्व आयसीसी बाद फेरीतील सामन्यांत केटलबरो यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे आणि निराशाजनक म्हणजे सर्व सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी टीम इंडिया श्रीलंका विरोधात 2014 टी-20 वर्ल्ड कप फायनल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2015 आयसीसी वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पराभूत, 2016 T20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात वेस्ट इंडीजकडून पराभूत झाला आहे. शिवाय, पाकिस्तान विरुद्ध 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आणि 2019 वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा जेव्हा पराभव झाला तेव्हा पंच म्हणून केटलबरो मैदानात हजर होते. यापूर्वी माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर यांनी देखील केटलबरोबाबत मजेदार मिम शेअर केली होती.
.@ICC #WTCFinal 😉 pic.twitter.com/qdKPXgf1LG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 24, 2021
डब्ल्यूटीसी फायनल सामना भारत-न्यूझीलंड संघात 18-22 जून दरम्यान खेळला जाणार आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघाने 2 जूनपासून इंग्लंड विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी सामन्यांची सुरुवात केली आहे तर न्यूझीलंड विरोधात फायनल सामन्यांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.