टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC World Test Championship Final 2021: अहमदाबाद (Ahmedabad) पिंक-बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामन्यात पराभवानंतर इंग्लंड (England) संघाचा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला (India) विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या 7.4 ओव्हरमध्ये गाठले. या विजयासह टीम इंडियाने आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे तथापि, त्यांना अद्याप फायनलचं तिकीट मिळालेले नाही. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून टीम इंडिया (Team India) टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या जवळ पोहचली असली तरी त्यांचं टेंशन अद्याप कायम आहे. भारतीय संघाला आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणाऱ्या चौथ्या सामन्यात विजय किंवा किमान सामना ड्रॉ करणे गरजेचे आहे कारण इंग्लिश टीमने विजय मिळवून सामना अनिर्णीत केला तर भारतीय संघाचे देखील फायनलचे स्वप्न भंग होईल ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल. (IND vs ENG 3rd D/N Test Day 2: अक्षरच्या फिरकीचा बोलबाला, इंग्लंडने भारताविरुद्ध केली सर्वात Lowest धावसंख्या, पहा सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड)

भारत आणि इंग्लंड संघातील 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला कोणता संघ टक्कर देईल याचा निर्णय होईल. चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळेल तर ड्रॉ झाल्यास ऑस्ट्रेलिया बाजी मारेल आणि फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे, आता भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय किंवा ड्रॉ गरजेचा असेल कारण इंग्लंड संघ यजमान संघाच्या आशा धुळीस मिळवण्यासाठी उत्सुक असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने गुरुवारी इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाने यापूर्वीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दुसरीकडे, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या डे/नाईट टेस्टमध्ये भारताच्या विजयात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने चमकदार कामगिरी केली. अक्षरने सामन्यात एकूण 11 तर अश्विनने 7 विकेट घेतल्या. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांचा सपहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 145 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना 33 धावांची आघाडी मिळाली.