Train | (Photo Credits: X)

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India-vs-Australia Final) यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023 Final) साठी अंतिम सामना पार पडत आहे. आज पार पडणाऱ्या या सामन्यासाठी देशभरातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत. अशा वेळी भारतीय रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद अशी विशेष वंदे भारत ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वे (WR) मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान ही ट्रेन सोडणार आहे. सामन्यासाठी होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची संख्या विचारात घेता रविवारच्या सामन्यापूर्वी एकूण 11 विशेष गाड्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

आरक्षण प्रणाली (PRS) काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध

मध्य रेल्वेच्या आदेशानुसार, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 09035, रविवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.15 वाजता मुंबई सेंट्रल येथून निघणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी 10.40 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. तसेच अहमदाबाद-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक 09036, सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथून सकाळी 2.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 7.25 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ट्रेन बोरिवली, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबेल आणि 8 डब्यांसह चालेल, ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच असतील. या विशेष गाड्यांसाठी बुकिंग सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध आहे. (हेही वाचा, ICC World Cup 2023 Final: सोनिया गांधी यांच्याकडून आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा (Watch Video))

विमानापेक्षाक्षी तिकीट दर कमी

क्रिकेट रसिकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणखी एका उपक्रमात, विशेष क्रिकेट विश्वचषक 2023 ट्रेन शनिवारी संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीहून अहमदाबादसाठी रवाना झाली. भारतीय रेल्वे आणि भारत सरकारच्या या हालचालीचा उद्देश ऐतिहासिक अंतिम सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीला तोंड देण्यासाठी आहे. ट्रेनमध्ये वाढलेल्या हवाई भाड्यांपेक्षा कमी किमतीत जागा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये स्लीपर शुल्क 620 रुपये प्रति बर्थ, 3AC इकॉनॉमी रुपये 1525, 3AC 1665 रुपये आणि 1st AC 3490 रुपये आहे. ट्रेन रविवारी सकाळी अहमदाबादला पोहोचणार आहे. आणि सामना संपल्यानंतर पहाटे 2.30 वाजता दिल्लीसाठी रवाना होईल.

वंदे भारत एक्सप्रेस अर्ध-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प

वंदे भारत एक्सप्रेस हा अर्ध-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. ज्याद्वारे पहिली ट्रेन 2019 मध्ये प्रथमच नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर सुरू करण्यात आली. या ट्रेन्सचे व्यवस्थापन आणि देखभाल भारतीय रेल्वेकडून केली जाते. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये उत्कृष्ट घरगुती ‘कवच’ तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जी एक ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टम (TCAS) आहे. सुविधांच्या बाबतीत, या ट्रेन्स विमान, इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि ऑटोमेटेड दरवाजे यांसारख्या रिक्लाईनिंग सीट्सने सुसज्ज आहेत. ते जास्तीत जास्त 180 किमी प्रति तास वेगाने प्रवास करू शकतात. तथापि, ते सध्या ताशी 160 किमी वेगाने धावत आहेत. तसेच ट्रेनच्या प्रत्येक डब्यात फायर डिटेक्शन आणि कम्युनिकेशन यंत्रणा बसवण्यात आली आहे.