ICC World Cup 2019: इंग्लंड मध्ये सचिन तेंडुलकर ने चालवली 119 वर्ष जुनी कार; युजर्स ने विचारले, 'परवाना आहे का?'
(Photo Credits: Instagram)

आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये भारतीय संघ आपल्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाचे गोलंदाज क्रिकेट च्या मैदानावर कमालीची कामगिरी करत आहे. दुसरीकडे, क्रिकेट चा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मैदानाबाहेर राहून लोकांनां खुश करतोय. सचिन स्टार स्पोर्ट्स (Star Sports) च्या कॉमेंट्री टीममध्ये आहे आणि तो भारताच्या सामन्यात टिप्पणी करताना दिसतो. मात्र, इंग्लंड (England) मध्ये कॉमेंट्री व्यतिरिक्त, सचिन इतर गोष्टींचा देखील आनंद घेत आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या विडिओ मध्ये सचिन एक 119 वर्ष जुनी कार चालवताना दिसतोय. कारमध्ये त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर देखील आहे आणि स्वत: चा सचिन कार चालवत आहे. (World Cup 2019:ऑस्ट्रेलियन फॅन ने संजय मांजरेकर वर लावला पक्षपाताचा आरोप, ICC कडे केली तक्रार)

सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, "मी एक 119 वर्षांची गाडी चालवित आहे. यासाठी रॉयल ऑटोमोबाईल क्लबचे जेरेमी वॉन (Jeremy Vaugha) आणि माझ्या प्रिय मित्र होमाडेझ सोराबजी (Hormazd Sorabjee) यांचे धन्यवाद. हा अनुभव नेहमी माझ्यासाठी आठवणीत राहील." शिवाय, या व्हिडिओद्वारे सचिनच्या काही चाहत्यांनी त्याच्याशी मजा केली. एका चाहत्याने लिहिले की 'सचिन तुमच्या कडे परवाना आहे का?.'

दरम्यान, क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावा करणारा सचिन कॉमेंट्रीच्या पीचवर देखील बिनधास्त खेळी करतोय. नुकत्याच त्याने एम एस धोनीच्या संथ फलंदाजीवरील खेळीबद्दल आपले मत प्रदर्शित केले होते. धोनीने अफगाणिस्तानविरुद्धच्या मंद फलंदाजीची टीका केली होती.