ICC World Cup 2019: सेमीफायनलआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; शॉन मार्श टूर्नामेंटमधून बाहेर, ग्लेन मॅक्सवेल जखमी
(Image Credit: AP/PTI Photo)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक आणि दुखापत दोन्ही यंदा एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते. एकीकडे क्रिकेट विश्वातले मोठी नावं-शिखर धवन (Shikhar Dhawan), कगिसो रबाडा (Kagiso Rabad), डेल स्टेन (Dale Steyn) सारखे कित्येक प्रभावी खेळाडूंना विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. आणि आता जेव्हा विश्वकपचे लीग स्टेजमधील सामने संपले आहे, दुखापतीने सत्र मात्र सुरूच आहे. सध्या, पहिले चार संघ आपल्या सेमीफायनलमधील मॅचमध्ये आपले लक्ष केंद्रित करत आहे. मात्र आता या सामन्यांआधी ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला मोठा झटका बसला आहे. दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. त्यातील एक खेळाडू वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. (ICC World Cup 2019 Semi-Final: विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात टीम इंडियाला कोणाचे आव्हान? जाणून घ्या संभाव्य सेमिफायनल संघ)

सध्या, ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारपासून सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू शॉन मार्श (Shaun Marsh) याला दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. ओल्ड ट्रैफर्ड (Old Trafford) मैदानातं नेटमध्ये सराव कराताना मार्शला दुखापत झाली होती, त्याच्या जागी पीटर हैंड्सकॉम्ब (Peter Handscomb) याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) देखील जखमी झाला आहे. यंदा मार्शने विश्वचषकात केवळ दोन सामने खेळले होते. दुसरीकडे, मॅक्सवेलला जलद गोलंदाज मिशेल स्टार्क (Mitchell Starc) चा बॉल लागल्याने त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. मात्र त्याची दुखापत गंभीर नसल्यामुळं तो सामना खेळू शकतो.

ऑस्ट्रेलिया आपला शेवटचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरोधात खेळणार आहे.