(Photo Credit: Twitter)

वेस्ट इंडीज (West Indies)-अफगाणिस्तान (Afghanistan)यांच्यातील आयसीसी (ICC) विश्वकपमधील सामन्यात अफगाणच्या यष्टीरक्षक इकराम अलीने (Ikram Ali Khil) 86 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह त्याने विश्वविक्रम केला. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला मागे टाकत सर्वात कमी वयात वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खीलने त्याच्या नावावर नोंदवला. खीलला विश्वकपच्या मध्यावर संघात घेण्यात आले होते. सलामीवीर मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad)याला दुखापत झाल्यानंतर त्याला विश्वकप खेळण्याची संधी देण्यात अली होती. (WI vs AFG, World Cup 2019: विश्वचषकच्या अंतिम सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच अनोखं सेलिब्रेशन, कॅच घेताच मैदानावर केल्या पुश-अप्स; पहा Photo)

वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात 80 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम यंदा खीलने केला आहे. खीलने 18 वर्ष 278 दिवस वय असताना 86 धावांची खेळी केली. सचिनने 1992 मध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध 84 तर झिम्बॉम्बे (Zimbabwe)विरुद्ध 81 धावांची खेळी केली होती. तेव्हा सचिनचे वय 18 वर्ष 323 दिवस इतकं होतं. शिवाय, विश्वचषकात सर्वात कमी वयात अर्धशतक कऱणारा इकराम पहिलाच यष्टीरक्षक बनला आहे. याआधी बांगलादेश च्या मुश्फिकर रहीम याने 2007 मध्ये 19 वर्ष 246 दिवस वय असताना अर्धशतक केलं होतं.

यंदाच्या विश्वकपमध्ये आपला पहिला विजय मिळवत अफगाणिस्तान संघाला शेवट सुखद करायचा होता. संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली पण कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) आणि केमार रोच (Kemar Roach) याच्या माऱ्यासमोर त्यांचा प्रयत्न अपुरा पडला. रहमत शाह (Rahmat Shah) आणि इकराम अली यांचे अर्धशतक आणि नजीबुल्लाह झारदन, असगर अफगाण (Asgar Afghan) यांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाला 288 धावा केल्या. याआधी वेस्ट इंडिज कर्णधार जेसन होल्डर ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इवान लुईस, शाई होप आणि निकोलस पूरन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिजने 50 षटकांत 6 बाद 311 धावा केल्या.