आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2020ला (ICC Women's T20 World Cup 2020) सुरुवात झाली असून भारतीय महिला संघ उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 मार्च रोजी सेमीफाइनलचा सामना होणार आहे. तसेच या विश्वचषकात कोणता संघ टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, याआधीच आसीसीने बोर्डाने आयसीसी टी-20 महिला क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताची अवघ्या 16 वर्षाची खेळाडू शेफाली वर्माने (Shafali Verma) धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थानी झेप घेतली आहे. शेफाली याआधी आयसीसी क्रमवारीत 20 व्या स्थानावर होती. शेफालीच्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑस्ट्रेलिया येथे खेळला जाणाऱ्या टि-20 विश्वचषकात भारतीय फलंदाज शेफालीने तडाखेबाज फलंदाजी करून सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. शेफालीने केवळ 4 समान्यात 161 धावा ठोकल्या आहेत. यात 18 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर तिने आसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. शेफालीने भारताची सलामीवीर स्मृती मांधना, जेमिया रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला यांना पाठीमागे टाकले आहे. चारही सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करून भारतीय संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलणारी शेफाली हिने थेट 19 क्रमांकाची झेप घेतली आहे. आसीसी महिला टी-20 विश्वचषक खेळण्याआधी शेफाली 20 क्रमांकावर होती. त्यानंतर तिने थेट पहिले स्थान गाठले आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडची 20 वर्षीय सोफी इकलेस्टोन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. हे देखील वाचा- Women's T20 World Cup Semi-Final: महिला टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास कशी असेल भारताची स्थिती, जाणून घ्या
आयसीसीचे ट्वीट-
🚨 RANKINGS UPDATE 🚨
Youngsters at the top of the world! New No.1 on the @MRFWorldwide ICC Women's T20I Rankings following the #T20WorldCup group stage!
Batting ▶️ Shafali Verma 🇮🇳
Bowling ▶️ Sophie Ecclestone 🏴 pic.twitter.com/KU4pAjKIxr
— ICC (@ICC) March 4, 2020
महिला टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या टॉप-10 यादीत भारताचे 3 खेळाडूंचा समावेश आहे. पूनम यादवने या स्पर्धेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे तिला 12 व्या स्थानावरून 8 वे स्थान गाठता आले आहे. राधा यादव हीचे तीन क्रमांकाने तर, दीप्ती शर्मा हीची 1 क्रमांकाने घसरण झाली आहे. यामुळे भारतीय गोलंदाजांच्या कामिगिरीवर निराशा व्यक्त करण्यात येत आहे.