Pakistan captain Bismah Maroof (left) and Indian captain Mithali Raj (right) (Photo credit: Twitter)

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women's World Cup 2022) शुक्रवारपासून न्यूझीलंडमध्ये सुरू झाला आहे. पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. या स्पर्धेत यजमानांसह वेस्ट इंडिज, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ सहभागी होणार आहेत. 2019 च्या विश्वचषकाप्रमाणे यावेळीही राऊंड रॉबिन लीगच्या आधारे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये सर्व संघ एकदा एकमेकांसमोर येतील. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (India Women vs Pakistan Women) खेळाची सुरुवात करेल. हा सामना रविवारी, 6 मार्च रोजी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी 6:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये भारतीय संघ विजेतेपदापासून अवघे काही इंच दूर राहिला. त्यामुळे यावेळी मिताली राज आणि तिचा संघ जेतेपदासाठी शर्थीने प्रयत्न करतील.

स्टार स्पोर्ट्स भारतातील आयसीसी महिला विश्वचषक 2022 चे अधिकृत प्रसारक आहेत आणि त्यांच्या चॅनेलवर खेळांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉट स्टारवर पाहता येईल. तसेच चाहते स्टार स्पोर्ट्स 2/2HD/3 वर हे सामने पाहू शकतात. (हेही वाचा: रवींद्र जडेजाने केला कहर, नाबाद दीडशतकी खेळीसह दिग्गजांना मागे टाकून बनला 1 नंबरी; पहा मोहालीत दुसऱ्या दिवशी पडला विक्रमांचा पाऊस)

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लीगमधील शेवटचा सामना 28 मार्च रोजी क्राइस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे 30 आणि 31 मार्चला होतील. अंतिम सामना 3 मार्च रोजी क्राइस्टचुरी येथे होणार आहे. विश्वचषकाची अंतिम फेरी जिंकणाऱ्या संघाला सुमारे 10 कोटी रुपये मिळतील. ही बक्षीस रक्कम 2017 साली इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या दुप्पट आहे. विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमे 75 टक्के वाढ करण्यात आली आहे. उपविजेत्याला 4.50 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना 2.25-2.25 कोटी तर इतर चार संघांना प्रत्येकी 18.76 लाख रुपये दिले जातील.