ऑस्ट्रेलिया महिला संघ (Photo Credit: Instagram)

Women's World Cup 2022 Points Table: ऑस्ट्रेलियाने (Australia) परफेक्ट रेकॉर्डसह आयसीसी महिला विश्वचषकचा (ICC Women's World Cup) लीग टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 7 वा सामना जिंकला आणि 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाला 5 विकेटने पराभूत केले. 135 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशी फिरकीपटूंनी आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करून चॅम्पियन संघावर दडपण आणले होते, पण बेथ मुनी (Beth Mooney) हिने संयमी फलंदाजी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका (South Africa) महिला संघाने देखील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, भारत (India) पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. (ICC Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलिया महिलांचा अजिंक्य प्रवास सुरूच, शेवटच्या लीग सामन्यात बांगलादेशचा पराभव करून सेमीफायनलमध्ये पाऊल ठेवले)

मिताली राज हिची टीम आता पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाला आणि त्यामुळे भारतासाठी परिस्थिती गुंतागुंतीची झाली. अशा परिस्थितीत आता सेमीफायनलमध्ये टीम इंडिया प्रवेश करणार की नाही? हे सर्व काही आता टीम इंडिया खेळाडूंच्या हाती आहे. भारताचा साखळी सामन्यातील अखेरचा सामना 27 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत केले नाही तर भारत उपांत्य शर्यतीतून बाहेर पडेल. त्यामुळे भारतीय संघासाठी ही ‘करो या मरो’ची स्थिती आहे. दरम्यान, गतविजेता इंग्लंड संघाची स्थिती चांगली दिसत आहे. पुढील सामन्यात बांगलादेशवर विजय निश्चितच करताच ते टॉप-4 मध्ये स्थान निश्चित होईल.

दुसरीकडे, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश - सर्व 3 सेमीफायनल शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश प्रत्येकी एक विजयासह पॉईंट टेबलच्या तळाशी बसलेले आहेत. तर यजमान न्यूझीलंड यावेळी विश्वचषकात फक्त दोनच सामने जिंकू शकले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश महिला विश्वचषक सामन्याबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलियासमोर 136 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 32.1 षटकात पूर्ण केले. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील विकेट ज्याप्रकारे पडू लागल्या, त्यामुळे सामन्यात उलटफेर होण्याची आशा निर्माण झाली. पण, बेथ मुनी हिने डाव हाताळला आणि ऑस्ट्रेलिया हा नंबर 1 संघ का आहे हे दाखवून दिले.