ICC U19 World Cup 2022: सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीत बांग्लादेश संघाशी भिडणार टीम इंडिया, 2020 फायनलमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी
राज बावा आणि अंगकृष्ण रघुवंशी (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs BAN, U19 World Cup 2022: ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे आणि सुपर लीग स्टेज व प्लेट स्पर्धेत कोण-कोणते संघ आमनेसमॅन येईल हे आता स्पष्ट झाले आहे. आठ सुपर लीग संघांपैकी सहा संघांनी यापूर्वी भारत (India), ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि गतविजेत्या बांगलादेशसह (Bangladesh) स्पर्धा जिंकली आहे. चार वेळचा अंडर-19 वर्ल्ड कप विजेता टीम इंडिया आणि गतविजेत्या बांगलादेशचा सामना 29 जानेवारी रोजी आयसीसी U19 विश्वचषकाच्या सुपर लीग उपांत्यपूर्व (World Cup Super League Quarter-final) फेरीत होणार आहे. भारताने सुपर लीगच्या टप्प्यात जबरदस्त फॉर्ममध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाने (Indian Team) ब गटातील त्यांचे सर्व तीन सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आणि आता ते बांगलादेशविरुद्ध गेल्या स्पर्धेतील पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धारित असतील. (U19 World Cup 2022: हरनूर सिंहची 88 धावांची शानदार खेळी, युवा टीम इंडियाची आयर्लंडवर 174 धावांनी मात; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक)

गेल्या वेळी 2019-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पराभव करून पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले होते. दोन्ही संघाच्या ग्रुप टप्प्याच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर राज बावा आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या शानदार शतकांच्या जोरावर टीम इंडियाने यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडला पराभूत करणाऱ्या युगांडावर 326 धावांनी दणदणीत विजय मिळवून ग्रुप स्टेज संपुष्टात आणला. तर बांगलादेशचा प्रवास इतका चांगला राहिला नाही, 2020 चॅम्पियन्स अ गटात दुसर्‍या स्थानावर इंग्लंडकडून सलामीचा सामना गमावल्यानंतर सावरले. कॅनडावर आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर UAE विरुद्ध पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नऊ विकेटने DLS नियमाने विजय मिळवला आणि भारताविरुद्ध क्वार्टर-फायनल सामन्यावर शिक्कामोर्तब केला.

आणि 2020 स्पर्धेत भारतीय संघ त्यांच्या तीन विकेट्सच्या पराभवाचा बदला घेण्याची इच्छा असेल, तर बांगलादेश संघ मोठ्या लढतीपूर्वी योग्यवेळी लयीत परतला आहे. आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2020 अंतिम सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करून भारताने 47.2 षटकात 177 धावा केल्या. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 88 धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. पावसामुळे दुसरा डाव 47 षटकांचा करण्यात आला आणि लक्ष्यही 170 धावांचे झाले. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने 42.1 षटकांत सात विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि प्रथमच जेतेपदावर नाव कोरले.