बाबर आझम (Photo Credit: Getty Images)

एकीकडे, वर्ष 2019 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांची प्रभावी बॅटिंग पाहायला मिळाली, तर दुसरीकडे दुसरा फलंदाज भावी स्टार म्हणून उदयास आला आहे. येथे आपण बोलत आहो, पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम(Babar Azam), ज्याने वनडे आणि टी-20 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन कसोटी सामन्यात 2 शतके ठोकणारा बाबर आयसीसी कसोटी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. क्रिकेटच्या प्रदीर्घ स्वरूपात त्याच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील यंदाच्या अखेरच्या टेस्ट मालिकेनंतर आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या पाचही खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताच बदल झाला नाही. भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या, न्यूझीलंडचा कर्णधारमार्नस केन विल्यम्सन तिसऱ्या चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा नवीन मध्यम फळीतील मार्नस लाबुशेन पाचव्या स्थानी कायम आहे. विराट वर्ष 2019 च्या अखेरीस अव्वल स्थानी बनून आहे.  (टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे दीपक चाहर एप्रिल 2020 पर्यंत भारतीय संघातून बाहेर)

दरम्यान, नवीन कसोटी क्रमवारीत बाबरने तीन स्थानांची झेप घेतली. तो 9 व्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजाने जो रुट, डेव्हिड वॉर्नर आणि भारतीय कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना मागे टाकले. श्रीलंकाविरूद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरीचा फायदा बाबरला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांमध्ये बाबरने 262 धावा केल्या. बाबरने रावळपिंडी आणि कराचीमध्ये शतक ठोकले आणि दोन्ही वेळा नाबाद राहिला. बाबरऐवजी ऑस्ट्रेलियाविरुध्द न्यूझीलंडकडून अतिशय चांगली कामगिरी करणारा रॉस टेलर आता अव्वल दहामध्ये पोहोचला आहे. आत्ता ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध आणखीन दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. जिथे स्मिथ चांगली कामगिरी करून विराटकडून पहिले स्थान परत घेऊ शकते.

बाबर आझमने फलंदाजांच्या क्रमवारीत बदल झाली असली तरीही गोलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. पॅट कमिन्स प्रथम क्रमांकावर आहे. कगिसो रबाडा दुसर्‍या आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.