ICC Test Rankings: स्टिव्ह स्मिथ याला पछाडत विराट कोहली टेस्टमध्ये पुन्हा बनला नंबर 1 फलंदाज; मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा Top 10 मधून आऊट
विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टेस्ट मालिकेत खराब प्रदर्शन केले असून त्यानंतर त्याच्या कसोटी क्रमवारी घसरण झाली आहे. दुसरीकडे, कोहलीने बांग्लादेशविरूद्ध चांगली कामगिरी बजावत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अनेक गुणांचा फायदा करून घेत अव्वल स्थान मिळवले आहे. मार्च 2018 मध्ये बॉल टॅम्परिंगनंतर एक वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत शानदार प्रदर्शन केले आणि कसोटीक्रमवारीत पहिले स्थान मिळविले, परंतु पुन्हा एकदा कोहलीने त्याला मागे टाकले आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर स्मिथ 923 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. दोंघांच्या गुणांमध्ये केवळ 5 गुणांचा फरक आहे. अ‍ॅडिलेडमध्ये पाकिस्तानविरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्यात नाबाद तिहेरी शतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने 12 गुणांची कमाई केली आणि लांब उडी मारत पाचव्या स्थानावर पोचला आहे. (टीम इंडियातील 'या' 5 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले पदार्पण)

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 877 गुणांसहतिसर्‍या स्थानावर आहे.विल्यमसनकोहली आणि स्मिथपेक्षा खूप मागे आहे. वर्षाच्या सुरूवातीस 110 व्या क्रमांकावर आल्यानंतर मार्नस लाबूशेन याचा पहिल्यांदा प्रथम दहा खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे. दुसरीकडे, इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील मॅचनंतर खेळाडूंच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचाही पहिल्या दहा खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात 226 धावांच्या खेळीने रूटला 11व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर नेले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाज मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा पहिल्या दहा स्थानातून बाहेर पडले आहेत.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच विकेटमुळे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 830 गुणांसह तिसर्‍या स्थानावर स्थान मिळवले आहे आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही त्याने आपले स्थान मजबूत केले आहे. ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवाल याने 10 विकेट्सच्या जोरावर प्रथम 50 मध्ये स्थान मिळवले आहे तर शतकवीर शमराह ब्रूक्स याने 68 स्थानावरून 62 व्या स्थानावर झेप घेतली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने बांग्लादेशविरुद्ध दोन्ही टेस्ट सामन्यात शानदार प्रदर्शन करत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. शमी 771 गुणांसह दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.