ICC Test Rankings: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील तिसऱ्या अहमदाबाद कसोटी सामन्यानंतर आयसीसीने टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. आयसीसीच्या (ICC) सध्याच्या कसोटी क्रमवारीत भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना चांगला फायदा झाला आहे तर जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी जोडीला मोठे नुकसान झाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत 'हिटमॅन' रोहितने फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोत्तम स्थान पटकावले आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या पिंक-बॉल टेस्टच्या पहिल्या डावात 66 आणि दुसऱ्या डावात 25 धावांनी रोहितला सहा स्थानांचा फायदा करून दिला आणि त्याने 8व्या स्थानावर झेप घेतली. शिवाय, अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या डावात फ्लॉप झालेल्या चेतेश्वर पुजाराची 10व्या स्थानी घसरण झाली आहे. याशिवाय, अन्य फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. (Ravi Ashwin on Surpassing Anil Kumble: अनिल कुंबळे यांचे टेस्ट 619 विकेट्स आर अश्विनच्या रडारवर? पहा काय म्हणाला टीम इंडिया ऑफ स्पिनर)
न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनचे अव्वल स्थानावरील वर्चस्व कायम आहे तर ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन दुसऱ्या व तिसऱ्या क्रमवार आहेत. दरम्यान, इंग्लंड कर्णधार जो रूट आणि भारतीय कर्णधार विराट कोहली अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. दुसरीकडे, गोलंदाजी क्रमवारीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. अहमदाबाद कसोटी सामन्यात 7 विकेट घेणारा भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची टॉप-3 गोलंदाजांमध्ये एंट्री झाली आहे. शिवाय, मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फिरकीपटूंचा दबदबा राहिल्याने वेगवान गोलंदाजांना खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही ज्यामुळे आघाडीचे गोलंदाज- जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जसप्रीत बुमराह यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. अँडरसन तीन स्थान खाली येत सहाव्या तर ब्रॉड सातव्या आणि बुमराह 9व्या स्थानी घसरला आहे.
India opener Rohit Sharma storms into the top 10 to a career-best eighth position in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 💥
Full list: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/Hqb9uTWnzJ
— ICC (@ICC) February 28, 2021
अश्विन कसोटी क्रमवारीत पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये एकमेव फिरकीपटू आहे. पिंक-बॉल टेस्टच्या दुसर्या दिवशी अश्विन 400 कसोटी विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. दुसर्या कसोटी सामन्यात पदार्पण करणारा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल 38व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिन्स आणि नील वॅग्नर यांनी प्रथम दोन स्थानांवर कब्जा केला आहे.